Honey For Skin Care | ‘या’ गोष्टी मधात मिसळून चेहऱ्यावर लावल्याने मिळतात अनेक फायदे

Honey For Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: मधाचा उपयोग औषधी म्हणून केला जातो. कारण मध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आरोग्यासोबतच मध आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये प्रोटीन, ओमेगा ॲसिड, विटामिन, मिनरल्स इत्यादी गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म त्वचेची संबंधित समस्या दूर करण्यास मदत करतात. मधाच्या मदतीने त्वचेवरील पिंपल्स, डाग, पिगमेंटेशन इत्यादी समस्या दूर करता येऊ शकतात. यासाठी तुम्हाला मधाचा पुढील पद्धतीने वापर करावा लागेल.

मध आणि दूध (Honey and Milk For Skin Care)

मधाच्या मदतीने चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही मधामध्ये दूध मिसळू शकतात. मध आणि दुधाचे मिश्रण त्वचेसाठी नैसर्गिक क्लिनर म्हणून काम करते. या दोन्ही गोष्टींमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला दोन चमचे मधामध्ये दोन चमचे दूध मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ही पेस्ट चेहऱ्यावर लावून गोलाकार पद्धतीने पंधरा मिनिटे मसाज करावी लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

मध आणि केळी (Honey and Banana For Skin Care)

तुम्ही केळी आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावू शकतात. यासाठी तुम्हाला केळी मॅश करून त्यामध्ये मध मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि काळे डाग दूर होण्यास मदत होते. तुम्ही या मिश्रणाचा वापर आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकतात.

मध आणि गुलाब जल (Honey and Rose Water For Skin Care)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही मध आणि गुलाब जलचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे मधामध्ये एक चमचा गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर ही पेस्ट तुम्हाला पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील मुरूम आणि काळे डाग दूर होण्यास मदत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या