शिंदेंच्या उपस्थितीत संजय जाधवांच्या मेळाव्यात राडा; जरांगेंच्या इशाऱ्यानंतर परभणीत नेमकं काय घडलं?

परभणीत खासदार संजय जाधव यांच्या मेळाव्यात जोरदार घोषणाबाजी झाल्याने मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलकांना बाहेर काढले.

Published On: 

Protestors chanting slogans at MP Sanjay Jadhav and Eknath Shinde rally in Parbhani

Eknath Shinde: परभणीत आज नेमकं काय घडणार, याचीच धाकधूक सर्वांना होती. आणि शेवटी ज्याची भीती होती, तेच घडलं! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतरही खासदार संजय (बंडू) जाधव यांचा शेतकरी मेळावा आज पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असलेल्या या मेळाव्यात मोठा राडा झाला.

मंचावर खासदार संजय जाधव यांचं भाषण रंगात आले असताना, अचानक कार्यक्रमस्थळी असलेल्या काही लोकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी आंदोलकांना थेट सभास्थळावरून बाहेर काढलं. सध्या तिथे परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती समोर आलीय.

मनोज जरांगे यांचा मुंबईत ‘हिशोब’ चुकवण्याचा इशारा

हा सगळा वाद सुरू झाला तो जरांगे यांच्या एका फोनवरून. मेळावा रद्द करण्यासाठी जरांगेंनी जाधवांना थेट अल्टीमेटम दिला होता. पण जाधवांनी शेवटच्या क्षणी माघार घेण्यास नकार दिला. “१५ दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. लोक येऊन बसलेत. तुम्ही मला रात्री जरी सांगितलं असतं, तरी मी कार्यक्रम रद्द केला असता,” असं स्पष्टीकरण जाधवांनी दिलं. जरांगेंच्या भावनांचा आदर आहे, पण ऐनवेळी आणि लोक जमल्यानंतर कार्यक्रम रद्द करणं शक्य नसल्याचं ते म्हणाले.

दुसरीकडे, जाधवांच्या या भूमिकेमुळे जरांगे प्रचंड संतापले. त्यांनी अत्यंत आक्रमक भाषेत जाधवांवर हल्लाबोल केला. “मराठ्यांनी तुला उभं केलंय, हे विसरू नकोस. कार्यक्रम घेणं हे तुझं अस्तित्व नाही, तर मराठा समाज सांभाळणं हे तुझं अस्तित्व होतं,” अशा शब्दांत त्यांनी जाधवांना सुनावलं. बंडू जाधव हा सगळ्यात थर्ड क्लास माणूस असल्याचं म्हणत, ५०० गुंडांच्या जीवावर राजकारण चालत नसल्याचा सणसणीत टोला त्यांनी लगावला.

संजय शिरसाट यांच्या सांगण्यावरून जाधवांनी शिंदेंना अडचणीत आणल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय. सध्या प्रशासनाने परभणीच्या सीमा सील केल्यात, त्यामुळे तिथे ताकद वाया घालवण्यापेक्षा थेट मुंबईत जाऊन बोकांडी बसू, असा आक्रमक पवित्रा जरांगेंनी घेतलाय. १२ सप्टेंबरला पुढची दिशा ठरणार असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे आता पुढे काय होणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही