Share

‘तू थर्ड क्लास माणूस, तुझी परतफेड मुंबईत करणार’; परभणीच्या मेळाव्यावरून मनोज जरांगेंचा बंडू जाधवांवर घणाघात

परभणीतील शेतकरी मेळाव्यावरून मनोज जरांगे आणि खासदार संजय जाधव यांच्यात मोठा वाद निर्माण झाला असून, जरांगेंनी जाधवांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Published On: 

Manoj Jarange Patil warns MP Sanjay Jadhav over Parbhani rally

परभणी – ऐन मेळाव्याच्या दिवशी मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि खासदार संजय (बंडू) जाधव यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळतेय. परभणीत आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडतोय. शिंदे गटात गेलेले खासदार संजय जाधव यांनी याचं आयोजन केलंय. पण या कार्यक्रमाला मनोज जरांगे यांनी कडाडून विरोध केला होता. हा मेळावा रद्द करा, असा थेट अल्टीमेटम त्यांनी दिला होता. मात्र, जाधवांनी शेवटच्या क्षणी माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळेच जरांगे यांचा पारा चांगलाच चढलाय.

Manoj Jarange | मुंबईत ‘हिशोब’ चुकता करणार

जरांगे यांनी अत्यंत आक्रमक भाषेत बंडू जाधवांवर हल्लाबोल केला. “मराठ्यांनी तुला उभं केलंय, हे विसरू नकोस. कार्यक्रम घेणं हे तुझं अस्तित्व नाही, तर मराठा समाज सांभाळणं हे तुझं अस्तित्व होतं,” अशा शब्दांत त्यांनी जाधवांना सुनावलं. बंडू जाधव हा सगळ्यात थर्ड क्लास माणूस निघाला असून, ५०० गुंडांच्या जोरावर राजकारण चालत नसतं, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.

संजय शिरसाट यांच्या सांगण्यावरून जाधवांनी शिंदेंना अडचणीत आणल्याचा गंभीर आरोपही जरांगेंनी केलाय. “शेतकऱ्यांच्या कार्यक्रमाच्या नावाखाली तुम्ही शिंदेंना नाचवलंत, आता याची परतफेड होणारच,” असा इशारा जरांगेंनी दिलाय. १२ सप्टेंबरला आमची पुढील दिशा ठरवली जाईल. सध्या परभणीच्या सीमा सील केल्यात. त्यामुळे तिथे ताकद वाया घालवण्यापेक्षा थेट मुंबईत जाऊन बोकांडी बसू, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलाय.

दुसरीकडे, या सर्व गदारोळात खासदार संजय जाधव यांनीही आपली भूमिका स्पष्ट केलीय. जरांगे यांना माझ्यावर टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं ते म्हणाले. गेल्या १५ दिवसांपासून या मेळाव्याची तयारी सुरू होती. “तुम्ही रात्री जरी निरोप दिला असता, तरी मी कार्यक्रम रद्द केला असता. पण आता लोक जमलेत, सर्व यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे ऑन द स्पॉट मेळावा रद्द करणं शक्य नाही,” असं जाधवांनी स्पष्ट केलं. जरांगेंच्या भावनांचा आदर आहे, पण नियोजित कार्यक्रम होणारच, यावर ते ठाम राहिले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install