मुंबई– एका बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परभणीत मोठा मेळावा ठरलेला होता. तर दुसरीकडे तो उधळून लावण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत. या हायव्होल्टेज ड्राम्यात आता बच्चू कडूंची एन्ट्री झालीय.
परभणीत शिवसेना खासदार बंडू जाधव यांनी आज शेतकरी मेळावा आयोजित केलाय. पण मनोज जरांगे पाटील यांनी याला कडाडून विरोध केलाय. कार्यक्रम रद्द करा आणि एकनाथ शिंदे यांनी परभणीत येऊ नये, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. मात्र, हा दबाव झुगारून जाधव मेळावा घेण्यावर ठाम राहिले. दुसरीकडे, एकनाथ शिंदेही मुंबईतून परभणीकडे रवाना झाले आहेत. ते थोड्याच वेळात विमानाने नांदेडला पोहोचतील.
Bacchu Kadu यांची मध्यस्थी आणि जरांगेंचा इशारा
या वाढत्या तणावादरम्यान शिंदे गटाने बच्चू कडूंच्या माध्यमातून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला. बच्चू कडूंनी थेट जरांगे पाटील यांना फोन लावला. “शिंदे साहेबांना या प्रकाराचं वाईट वाटलंय. हा कार्यक्रम मराठ्यांच्या विरोधात नाही. बंडू जाधवांनी त्या उद्देशाने कार्यक्रम घेतला असेल तर मला माहिती नाही,” असा शिंदेंचा निरोप कडूंनी जरांगेंना दिला.
पण जरांगे काही ऐकायला तयार नाहीत. त्यांनी थेट कडूंना सांगितलं की, “मी तुमचा शब्द मानतो. पण हा कार्यक्रम रद्दच करा.” बंडू जाधव मुद्दाम खुन्नस काढण्यासाठी हे करत असल्याचा आरोप जरांगेंनी केला. मराठ्यांचं मन दुखावून असे कार्यक्रम घेणं अजिबात योग्य नाही, असंही ते स्पष्टपणे म्हणाले.
यानंतर जरांगेंनी बंडू जाधवांवर जोरदार हल्ला चढवला. “एकनाथ शिंदेंनी काहीतरी खोके दिल्याशिवाय तो तिकडे जाणार नाही,” असा थेट आणि गंभीर आरोप त्यांनी केला. आता एकनाथ शिंदे थोड्याच वेळात परभणीच्या दिशेने निघतील. त्यामुळे मराठा आंदोलक तिथे आणखी काही गोंधळ घालणार का? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतरही एकनाथ शिंदेंचा कार्यक्रम होणार; परभणीत पोलिसांचा फौजफाटा
- ३० कोटींचा घोटाळा: संगणक चोरी ते ११२ एकर तारण; सचिन घायाळ केसची खळबळजनक ‘इनसाईड स्टोरी’
- चिकलठाणा पोलिसांची धडक कारवाई: १ लाखांच्या मुद्देमालासह दोन गोवंश तस्कर ताब्यात; ५ मुक्या जनावरांना जीवदान!
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







