‘महाराष्ट्र देशा’च्या दणक्यानंतर गोमांस तस्करांवरील कारवाया वाढल्या; पण चिकलठाणा, पाचोडसारखी धडक कारवाई MIDC पैठणमध्ये का नाही?

‘महाराष्ट्र देशा’च्या बातमीनंतर जिल्ह्यात गोमांस तस्करांवरील कारवाया वाढल्या आहेत. मात्र, पाचोड आणि चिकलठाणा पोलिसांच्या तुलनेत पैठण पोलिसांच्या ढोरकीन कारवाईत मुख्य सूत्रधारांना वाचवल्याचा संशय बळावला आहे.

Published On: 

Dhorkin beef raid compared with pachod and chikalthana police action in Sambhajinagar

पैठण | किरण काळे पाटील (Beef Raid) : दोनशे किलो गोमांस, ४० हजारांचा मुद्देमाल आणि आरोपी फक्त एक ६३ वर्षांचा वयोवृद्ध! शक्य आहे का? एकटा वयोवृद्ध माणूस दोन क्विंटल गोमांस स्वतः कापू शकतो? रविवारी ढोरकीनमध्ये झालेली कारवाई खरंच मोठी कामगिरी होती, की मूळ माफियांना वाचवण्यासाठी रचलेला हा निव्वळ एक ‘कागदी खेळ’ होता? ‘महाराष्ट्र देशा’ ने या संशयास्पद कारवाईचे वाभाडे काढल्यानंतर आता संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांच्या धाडी आणि कारवायांचा वेग वाढला आहे. पण या वाढलेल्या कारवायांमुळेच एमआयडीसी पैठण पोलिसांच्या तपासावरचे संशयाचे ढग अधिकच गडद झाले आहेत.

एमआयडीसी पैठण पोलिसांनी कुरेशी मोहल्ल्यात छापा मारून जलाल रज्जाक शेख या वृद्धाला रंगेहाथ पकडलं. त्याच्याकडून २०० किलो मांस, वजन काटा आणि धारदार सुरा जप्त करण्यात आला. पण धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांच्या अधिकृत एफआयआरमध्ये इतर अज्ञात आरोपींची संख्या चक्क ‘शून्य’ दाखवली आहे.

चिकलठाणा आणि पाचोड पोलिसांना जो कायदा दिसला, तो MIDC पैठण पोलिसांना का नाही?

छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा ग्रामीण पोलिसांनी वरुड काजी शिवारात रात्री ३.१५ (२८ ऑगस्ट) वाजता छापा मारून ५ जिवंत गोवंश आणि अवैध कत्तलीचे तब्बल १ लाख १५ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. या कारवाईत पोलिसांनी सलमान आणि जावेद या दोन तरुण आरोपींना बेड्या ठोकल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चिकलठाणा पोलिसांनी महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमासोबतच ‘प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६०’ (कलम 11) अगदी कडकपणे लावला.

शुक्रवारी (२८ ऑगस्ट) सकाळी पाचोड पोलिसांनी शासकीय दवाखान्याच्या मागे बागवान गल्लीत छापा मारला. तिथे भरदिवसा एका लाल रंगाच्या टाटा सुमो (MH-28 C-4570) गाडीत १०० किलो गोमांस आणून विकलं जात होतं. पोलिसांची धाड पडताच मुख्य आरोपी राजू मोहम्मद कुरेशी आणि त्याचा साथीदार ५ लाखांची गाडी आणि मोबाईल जागेवरच सोडून पळून गेले. पाचोड पोलिसांनी गाडी, मांस आणि मोबाईल असा तब्बल ५ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच पळून गेलेल्या तस्करांवर भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) संघटित गुन्ह्याचं कलम लावलं.

Beef Raid | पैठण MIDC पोलिसांच्या तपासात ‘काळंबेरं’ काय?

आता प्रश्न असा पडतो की, चिकलठाणा आणि पाचोड पोलिसांना जे जमलं, ते एमआयडीसी पैठण पोलिसांना का जमलं नाही? ढोरकीनमध्ये २०० किलो मांस पकडलं गेलं, मग ते गावात आकाशातून नक्कीच पडलं नसेल. जिवंत जनावरे कोणत्या मार्गाने ढोरकीनमध्ये आली? पाचोड पोलिसांनी ज्याप्रमाणे तस्करांची ‘टाटा सुमो’ जप्त केली, तशी ढोरकीनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मांस ठेवण्यासाठी किंवा वाहतुकीसाठी वापरलेली वाहने एफआयआरमधून कशी गायब झाली?

गोवंश कत्तलीच्या गुन्ह्यात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ‘प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम’ MIDC पैठण पोलिसांनी का लावला नाही? पाचोड पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलवरून आरोपींची साखळी शोधायला सुरुवात केलीये, मग ढोरकीन पोलिसांनी आपला तपास फक्त एका ६३ वर्षांच्या डमी आरोपीपुरता आणि दोन कलमांपुरता का गुंडाळला?

थोडक्यात सांगायचं तर, चिकलठाणा आणि पाचोड पोलिसांची अचूक कारवाईच ढोरकीन पोलिसांच्या संशयास्पद तपासाची पोलखोल करत आहे. सपोनि भारत मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत मुख्य सूत्रधारांना वाचवण्यासाठी काहीतरी मोठं ‘काळंबेरं’ शिजलं असल्याची दाट शंका आता नागरिक व्यक्त करत आहेत. केवळ कागदोपत्री कारवाई करून वरिष्ठांच्या डोळ्यात धूळफेक करण्यापेक्षा, पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे खोदून ढोरकीनची सप्लाय चेन उखडून काढावी, अशी संतप्त मागणी आता जोर धरत आहे.

या संपूर्ण प्रकरणी एमआयडीसी पैठण पोलिसांना आणि सपोनि भरत मोरे यांना आपली बाजू मांडायची असल्यास, ‘महाराष्ट्र देशा’च्या प्रतिनिधीसोबत संपर्क साधून बाजू मांडू शकता, ती देखील प्रसिद्ध केली जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही