Share

गोमांस कारवाई! ६३ वर्षांचा आजोबा एकटा २०० किलो गोमांस कसं कापू शकतो? पोलिसांचा ‘माफियांना’ वाचवण्याचा डाव?

ढोरकीन येथील कुरेशी मोहल्ल्यात पोलिसांनी छापा मारून २०० किलो गोमांस जप्त केले असून, या कारवाईत एका ६३ वर्षीय वृद्धाला अटक करण्यात आली आहे.

Published On: 

Dhorkin beef raid by MIDC Paithan police 2026

पैठण | किरण काळे पाटील (Dhorkin Beef Raid)- दोनशे किलो गोमांस, चाळीस हजारांचा मुद्देमाल आणि पोलिसांच्या हाती लागला तो फक्त एक ६३ वर्षांचा वृद्ध! विचार करा, एकटा वयोवृद्ध माणूस २०० किलो गोमांसाची कत्तल आणि वाहतूक स्वतः करू शकतो का? ढोरकीनमध्ये झालेली ही कारवाई कत्तलखान्यांच्या सिंडिकेटवरचा थेट घाव आहे की केवळ एका वृद्धाला पुढे करून बड्या माफियांना पाठीशी घालणारा कागदी बनाव?

एमआयडीसी पैठण पोलिसांनी कुरेशी मोहल्ल्यात छापा मारून जलाल रज्जाक शेख या वृद्धाला रंगेहाथ पकडल्याची नोंद केली आहे. त्याच्याकडून २०० किलो गोमांस, दीड फुटाचा धारदार सुरा आणि इलेक्ट्रिक वजन काटा जप्त करण्यात आला. मात्र, एफआयआरमधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, यात इतर अज्ञात आरोपींची संख्या चक्क ‘शून्य’ नोंदवण्यात आली आहे. इथंच तपासावर संशयाची सुई फिरते.

Dhorkin Beef Raid : ‘मोका’ आणि वाहतुकीच्या वाहनांचा तपास कुठे?

रविवारी २३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही कारवाई घडली. ढोरकीन बीट अंमलदार पोलीस हवालदार राहुल सर्जेराव मोहतमल यांना कुरेशी मोहल्ल्यात गोवंशाची कत्तल सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. सपोनि भारत मोरे यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकारी आणि पंचांना सोबत घेऊन जलाल रज्जाक शेख (वय ६३) याच्या घरावर छापा टाकला.

जलाल रज्जाक शेख यांच्या घरात २०० किलो गोमांस विक्रीसाठी ठेवलेले आढळले. पोलिसांनी ४० हजार रुपयांचे मांस, ४०० रुपयांचा सुरा आणि १५०० रुपयांचा वजन काटा असा एकूण ४१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत सीए तपासणीसाठी नमुने घेऊन उर्वरित मांस निर्जन ठिकाणी खड्डा करून नष्ट करण्यात आले. याप्रकरणी महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ च्या कलम ५(सी) आणि ९(ए) अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानेश्वर भवर करत आहेत.

ढोरकीन गोमांस कारवाई : सप्लाय चेन गायब, ‘मोका’ का लावला नाही?

कायदेशीर कारवाई झाली खरी, पण तपासातील त्रुटी अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण करत आहेत. सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गोवंश तस्करांवर थेट ‘मोका’ (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाईची मोहीम सुरू आहे. असे असताना ढोरकीन प्रकरणात पोलिसांनी फक्त दोन जमानती कलमांपुरता तपास का मर्यादित ठेवला?

गोवंश कत्तलीच्या गुन्ह्यात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ‘प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम’ (Prevention of Cruelty to Animals Act) या एफआयआरमधून जाणीवपूर्वक का गायब करण्यात आला? एवढ्या मोठ्या प्रमाणावर मांस ठेवण्यासाठी लागणारे कोल्ड स्टोरेज किंवा वाहतुकीसाठी वापरलेली वाहने जप्त केल्याचा साधा उल्लेखही नाही. यावरूनच पोलिसांचा हा सगळा तपास कुणाला तरी वाचवण्यासाठी सुरू असल्याचा संशय गडद होतो.

हे २०० किलो मांस गावात आकाशातून तर नक्कीच पडले नाही. जिवंत जनावरे कोणत्या महामार्गाने, कोणत्या चेकपोस्टवरून ढोरकीनच्या वस्तीत पोहोचली? एवढ्या मोठ्या प्रमाणावर मांस कापणे, त्याचे तुकडे करणे आणि वजन करणे हे एका ६३ वर्षांच्या वृद्धाचे काम असूच शकत नाही. यासाठी लागणारे तरुण कामगार आणि वितरक कोण होते?

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य सूत्रधारांना वाचवण्यासाठी घरातील एका वृद्धाला ‘डमी’ आरोपी बनवण्यात आलं आहे, असा संशय आता बळावला आहे. जिवंत जनावरे कोणत्या मार्गाने ढोरकीनमध्ये आली? चेकपोस्टवर पोलिसांची झोप लागली होती का?

सपोनि भारत मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत, मुख्य सूत्रधारांना का वाचवण्यात आलं? असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक करत आहेत. त्यामुळे केवळ कागदोपत्री कारवाई करण्यापेक्षा पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे खोदून सप्लाय चेन उखडून काढावी, अशी मागणी जोर धरत आहे.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install