२६/११ च्या शहीदांना अभिवादनासाठी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

२६/११ च्या शहीदांना अभिवादनासाठी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात २६ नोव्हेंबरला रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांचा यासाठी पुढाकार आहे.

Published On: 

Paithan MIDC Police Station blood donation camp tribute to 26/11 martyrs

पैठण : किरण काळे पाटील: मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान आणि निष्पाप नागरिकांना अभिवादन करण्यासाठी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात २६ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलिसांसह सुरक्षा दलातील अनेक जवान आणि निष्पाप नागरिकांनी प्राणांची आहुती दिली होती. शहीदांच्या स्मृती केवळ श्रद्धांजलीपुरत्या मर्यादित न ठेवता त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाजासाठी योगदान देण्याच्या उद्देशाने हे शिबिर घेण्यात येत आहे.

रक्तदानामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांनी केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही