Share

संशयाचं भूत मानगुटीवर! चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा गळा आवळून खून

बिडकीनच्या डीएमआयसी भागात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

Published On: 

Police investigating a murder case in Bidkin DMIC area Chhatrapati Sambhajinagar

पैठण | किरण काळे पाटील (ढाकेफळ) – संशयाचं भूत माणसाच्या मानगुटीवर बसलं की तो कोणत्या थराला जाईल, याचा काही नेम नसतो. बिडकीनच्या डीएमआयसी (DMIC) परिसरात अशीच एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.

चारित्र्यावर संशय घेत पतीने स्वतःच्या पत्नीचाच गळा आवळून निर्घृण खून केलाय. सोनाली बोरुडे असं या मृत महिलेचं नाव आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

पत्नीचा गळा आवळून खून, बिडकीन पोलिसांत गुन्हा दाखल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल प्रल्हाद बोरुडे (वय ४०, रा. दरेगाव, ता. पैठण) याला पत्नी सोनालीच्या चारित्र्यावर संशय होता. याच रागातून २४ ऑगस्टला दुपारी एक वाजेच्या पूर्वी त्याने डीएमआयसी परिसरातील एका शेतात सोनालीचा गळा आवळला आणि तिची हत्या केली.

पत्नीचा निर्घृण खून केल्यानंतर आरोपी अनिल बोरुडे याने घटनास्थळावरून पोबारा केला आहे. तो सध्या फरार असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत. तो हाती लागल्यानंतरच या हत्येमागचे आणखी काही धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे.

मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून तिची आई पद्मा बनकर (रा. शनि शिंगणापूर) यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यामुळे पोलिसांत तक्रार द्यायला उशीर झाला. पण अखेर आईने सावरत रात्री बिडकीन पोलीस ठाणे गाठले.

पोलिसांनी या प्रकरणी तातडीने भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३ (१) नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके या प्रकरणाचा (Murder Case) अधिक तपास करत आहेत. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही