Share

‘प्रश्न सोडवा, नाहीतर सत्तेत बसू नका’; मनोज जरांगेंचा सरकारवर घणाघात

मनोज जरांगे 29 ऑगस्टला उपोषण करणार असून मुंबई आंदोलनावरून सरकारला थेट इशारा दिला आहे.

Published On: 

Manoj Jarange on Mumbai protest | Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्रांच्या मुद्द्यांवरून कार्यकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. २९ ऑगस्टपासून उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. गरज पडल्यास पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच करू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने दक्षिण मुंबईतील आंदोलनांबाबत (Protest) नवीन नियम (New Rules) लागू केले आहे. त्यानुसार आझाद मैदानाव्यतिरिक्त या परिसरातील इतर कोणत्याही ठिकाणी निदर्शने, धरणे आंदोलन किंवा मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे. मराठे मुंबईत जाणार आहे, त्यामुळे मुद्दामून सरकारने हे केले, यात झाकून ठेवण्यासारखे काहीच नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

Manoj Jarange on Mumbai protest | Maratha Reservation

“सरकार विरोधात जात आहे, लोकांनी यांना सत्तेवर बसवले, मराठ्यांनी यांना सत्तेवर बसवले. मात्र, त्याच गोरगरीब मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखणे म्हणजे विरोध वाढण्याचे कारण फक्त सरकार आहे. कायदा तुमच्या हातात आम्ही देतो, सत्ता आम्ही तुमच्या हातात देतो आणि तुम्ही त्याचा गैरवापर करता.” असा संताप मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे.

“लोक यासाठी तुम्हाला निवडून देतात की, आपण कसल्याही परिस्थितीत मुंबईला जरी गेलो, तरी आपले सरकार तिथे आहे. आपले फडवणीस, आपले शिंदे, आपले दादा तिथे बसले आहेत. जे आपले म्हणून बसवले तेच मुंबईत येऊ नका म्हणतात, ही खूप मोठी दहशत झाली. ही सरकारची दादागिरी झाली, ही चालत नसते.” असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.

पुढे मनोज जरांगे म्हणाले की, “आमच्यापुढे दादागिरी करायची नाही. मग, आम्ही मुंबईत सगळीकडे आंदोलन करत असतो, विरोध केला तर रेल्वे फिरू देणार नाही, तुमची विमाने उडू देणार नाही. आम्ही कुणाला मोजत नसतो आणि ऐकतही नसतो. आम्ही कायद्याचा सन्मान करतो.”

“आम्ही तुम्हाला परवानगीचा अर्ज दिला आहे. तुम्ही परवानगी द्या, नाहीतर नका देऊ. मी जात असतो, आमचे जायचे ठरले तर मी जाणार, रात्रंदिवस बसणार तुम्ही काय करणार ते आम्ही बघणार? तुम्ही मुंबईत कसे अडवतात हे पण बघतो, असा धमकीवजा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

“तुम्हाला मुंबईत अडथळा नको तर आमचे प्रश्न सोडवा, तुम्हाला प्रश्न सोडवायचे नाही, तर सत्तेतही बसायचे नाही. मुंबईतील बांधवांनी समजून घ्यावे, आमच्यामुळे तुम्हाला त्रास होईल का? एखाद्या वेळेस नक्की होईल. मात्र, आम्हाला दहा-पंधरा दिवस सांभाळून घ्या, आम्ही तुमचेच आहोत, लोकांचे नाही.” असेही जरांगे यांनी सांगितले.

“मुंबईत कोणीच सुखी नाही, आम्ही त्यांना नीट करायला यायला लागलो. जर ठरले तर मुंबईत येणार, वर्षावरच येणार, तुमच्या बापाची पेंड आहे का? इकडे येऊ नको, तिकडे येऊ नको म्हणायला, तसेच, अशा नोटीसा पाठवणे म्हणजे लोकांवर जुलूम नाही का? असा सवालही मनोज जरांगे यांनी विचारला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही