Share

संभाजीनगर आत्महत्या: आयफोन नव्हे, तर ‘या’ कारणासाठी कुणालने उचललं टोकाचं पाऊल; पोलिसांचा मोठा गौप्यस्फोट

संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील कौटुंबिक आत्महत्येमागे आयफोनचा हट्ट हे कारण नसल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. प्रत्यक्षदर्शींनीही मोबाईलची अफवा फेटाळली आहे.

Published On: 

Khavdya Dongar Suicide real truth revealed by Sambhajinagar police

आयफोन हवा म्हणून मुलाने जीव दिला आणि त्याला वाचवताना आई-वडिलांचाही अंत झाला… कालपासून हीच चर्चा सगळीकडे सुरू होती. छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर काल घडलेल्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेत आता एक मोठा ट्विस्ट आला आहे. डीसीपी रत्नाकर नवले यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकत, आयफोनचा हट्ट हे आत्महत्येचं मुळी कारणच नसल्याचं स्पष्ट केलंय.

Khavdya Dongar Suicide: आत्महत्येचं खरं कारण काय?

काल सकाळपासून सोशल मीडियावर एकच चर्चा होती की ‘आयफोन १५’ साठी कुणाल चांदवडेने डोंगर गाठला. पण व्हायरल व्हिडिओमधील प्रत्यक्षदर्शी आणि गावचे माजी सरपंच संजय जाधव यांनी वेगळंच सत्य समोर आणलंय.

माजी सरपंच संजय जाधव यांच्या माहितीनुसार, कुणालकडे आधीपासूनच आयफोन होता. “तुझ्याकडे आयफोन आहे, आई-वडील तुझे किती लाड करतात,” असं समजावतानाचा व्हिडिओमधील तो आवाज जाधव यांचाच होता. त्यामुळे मोबाईलचा हट्ट ही निव्वळ अफवा ठरली आहे.

प्राथमिक तपासात कुणालचा त्याच्या वडिलांसोबत काहीतरी मोठा वाद झाल्याचं समोर येत आहे. हा वाद नेमका कशावरून होता, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

सर्वांत काळजाला चटका लावणारा प्रसंग म्हणजे आई आणि कुणालचा शेवटचा संवाद. “तुझा पप्पांसोबत वाद आहे ना, मी आत्ता मंगळसूत्र काढून फेकते. वडिलांना सोडून तुझ्यासोबत येते, पण मला सोडून जाऊ नकोस,” अशी आर्त विनवणी आई करत होती.

पण कुणाल हताश झाला होता. “माझं कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही, माझ्या लाईफचं सोल्युशनच नाही,” असं हताशपणे सांगत त्याने मृत्यूला कवटाळलं. एका कौटुंबिक वादाने आज एका हसत्या-खेळत्या कुटुंबाची राखरांगोळी केली. आता उरलंय ते शांत घर आणि असंख्य अनुत्तरित प्रश्न.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही