Share

डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही अंत; छत्रपती संभाजीनगरमध्ये हृदयद्रावक घटना

संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या मुलाला वाचवताना वडिलांचा तोल गेला. तर हे पाहून आईनेही उडी मारल्याने तिघांचा मृत्यू झाला.

Published On: 

Sambhajinagar Khavdya Dongar suicide incident spot

Suicide News : डोळ्यांदेखत पोटचा गोळा मृत्यूच्या दरीत उडी घेत असेल, तर आई-वडिलांच्या हृदयाची काय अवस्था होईल? याची नुसती कल्पनाही अंगावर काटा आणते. छत्रपती संभाजीनगरमध्ये अशीच एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. एका १८ वर्षीय तरुणाने डोंगरावरून उडी मारली. त्याला वाचवण्याच्या धडपडीत आई-वडिलांनीही आपले प्राण गमावले. क्षणार्धात अख्खं कुटुंबच संपलं.

शहरातील तिसगाव भागातील खवड्या डोंगरावर ही भीषण घटना घडली. कुणाल मुरलीधर चांदवडे हा तरुण तिथे जीवन संपवण्यासाठी गेला होता. हे समजताच त्याचे वडील मुरलीधर आणि आई संगीता यांनी तिथे धाव घेतली.

स्थानिक लोक आणि आई-वडील त्याला वारंवार समजावत होते. पण तो कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर वडिलांनी त्याला पकडण्यासाठी पुढे झेप घेतली. पण कुणालने उडी मारलीच. त्याला वाचवताना वडिलांचाही तोल गेला आणि तेही दरीत कोसळले. या भयानक दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. डोळ्यांसमोर नवरा आणि मुलाचा मृत्यू झाल्याने आईला मोठा धक्का बसला.

शोक अनावर झाल्याने संगीता यांनीही त्याच दरीत उडी घेत आपले जीवन संपवले. चांदवडे कुटुंब हे देवळाई सातारा परिसरातील रहिवासी होते. कुणालने हे टोकाचे पाऊल नेमके का उचलले? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही