पतीच्या एसटीतील नोकरीसाठी ४ लाखांची मागणी; सासरच्या जाचाला कंटाळून अकोल्यात विवाहितेची आत्महत्या

पतीच्या एसटी महामंडळातील नोकरीसाठी माहेरून ४ लाख रुपये आणण्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून अकोल्यात विवाहितेने आत्महत्या केली आहे.

Published On: 

Akola suicide case married woman ends life due to harassment

अकोला, 18 नोव्हेंबर: अकोल्यात सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. पतीला एसटी महामंडळात नोकरी लावण्यासाठी माहेरून चार लाख रुपये आणावेत, यासाठी तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.

करुणा मयूर वानखडे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथे राहणाऱ्या मनोहर मोहोड यांची ती मुलगी होती. १२ मे २०२४ रोजी तिचा विवाह अकोल्यातील खडकी परिसरातील मयूर ऊर्फ सुमित वानखडे याच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर अल्पावधीतच सासरच्या मंडळींनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली.

पतीला एसटी महामंडळात नोकरी मिळावी यासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी सासरच्यांकडून सतत होत होती. या जाचाला कंटाळून अखेर करुणाने गळफास घेतला. या प्रकरणी करुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी पती मयूरसह सासू, नणंद, दीर आणि भावजई अशा एकूण आठ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पतीला अटक केली असून, उर्वरित सात आरोपींचा शोध सुरू आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही