अकोला, 5 ऑक्टोबर: अकोला महापालिकेतील शिंदे गटाचे गटनेते आणि नगरसेवक सागर भारुका यांना हॉटेल मालकाकडे १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसांनी रात्री उशिरा ही कारवाई केली.
मिळालेल्या तक्रारीनुसार, ३ ऑक्टोबरच्या रात्री बसस्थानक परिसरातील ‘हॉटेल कृष्णा इम्पेरियल’मध्ये जाऊन गोंधळ घालत हॉटेल मालकाकडे १५ लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. याप्रकरणी हॉटेलचे कर्मचारी शोएब अख्तर जमील अख्तर यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी भारुका यांना अटक केली असून, आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या कारवाईवर प्रतिक्रिया देताना, सत्ताधारी भाजपकडून आपल्याला जाणीवपूर्वक गोवण्यात येत असल्याचा आरोप सागर भारुका यांनी केला आहे. यापूर्वी स्थायी समितीचे सभापती आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय अग्रवाल यांच्यासोबतच्या वादामुळेही ते चर्चेत आले होते, ज्या प्रकरणातही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
📌 महत्वाच्या बातम्या
- विधानपरिषद निवडणूक: नागपूर पदवीधरमध्ये भाजपला बंडखोरीचा फटका, अनिल सोले अपक्ष लढणार
- वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी गौतमीने खरोखरच हिंदवी पाटीलला हाकललं होतं का? नेमकं काय घडलं?
- लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं आता सामान्य बाब; आमिर खानची एक्स पत्नी किरण रावचं वक्तव्य
Quick Answers
सागर भारुका यांना हॉटेल मालकाकडे १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
हॉटेलचे कर्मचारी शोएब अख्तर जमील अख्तर यांनी याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सत्ताधारी भाजपकडून आपल्याला जाणीवपूर्वक गोवण्यात येत असल्याचा आरोप सागर भारुका यांनी केला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









