Share

वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी गौतमीने खरोखरच हिंदवी पाटीलला हाकललं होतं का? नेमकं काय घडलं?

गौतमी पाटीलच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी झालेल्या वादावर हिंदवी पाटीलने एका मुलाखतीत भाष्य केलं असून, त्या दिवशी घडलेला प्रसंग आणि ग्रुप सोडण्याचं कारण यावर प्रकाश टाकला आहे.

Published On: 

Gautami Patil and Hindavi Patil - Interview controversy and split details

प्रतिनिधी, 5 ऑक्टोबर : नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) आणि हिंदवी पाटील (Hindavi Patil) या दोघी एकेकाळी एकाच मंचावर लावणीचा ठेका धरताना दिसायच्या. मात्र, आता त्यांचे मार्ग कायमचे वेगळे झाले आहेत. या दोघींच्या मैत्रीत अचानक मिठाचा खडा कसा पडला, याची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगत असते.

विशेषतः गौतमीच्या वडिलांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराच्या वेळी या दोघींमध्ये झालेला वाद हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. आता याच बहुचर्चित प्रकरणावर स्वतः हिंदवी पाटीलने मौन सोडलं आहे.

एका ताज्या मुलाखतीत हिंदवीने त्या दिवशी नेमकं काय घडलं, याचा मोठा उलगडा केला आहे. गौतमीच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला गेल्यावर गौतमीने हिंदवीचा हात झटकला आणि तिला तिथून चक्क हाकलून दिलं, अशा वावड्या काही महिन्यांपूर्वी उठल्या होत्या. यावर स्पष्टीकरण देताना हिंदवीने सांगितलं की, सोशल मीडियावर फिरणाऱ्या सर्वच चर्चा शंभर टक्के खऱ्या नाहीत, पण त्यातला काही भाग नक्कीच खरा आहे.

Gautami Patil Hindavi Patil Controversy

त्या दुर्दैवी दिवशी हिंदवी गौतमीच्या सांत्वनासाठी तिथे पोहोचली होती. हिंदवीच्याच शब्दात सांगायचं तर, ती तिथे पोहोचली तेव्हा गौतमी नुकतीच अंघोळ करून बसली होती. हिंदवीने तिथे उपस्थित असलेल्या तिच्या आई आणि मामा-आजोबांची भेट घेतली. मात्र, त्यावेळी गौतमी प्रचंड तणावाखाली होती. मीडियाच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे तिला खूप त्रास झाला होता आणि ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडली होती.

अशा कठीण परिस्थितीत कोणती व्यक्ती खरी आहे आणि कोणती खोटी, हे समजण्याच्या मनस्थितीत ती नव्हती, असंही हिंदवी म्हणाली. विशेष म्हणजे, याच प्रसंगामुळे तू ग्रुपमधून बाहेर पडलीस का, असा थेट प्रश्न विचारल्यावर हिंदवीच्या डोळ्यांत पाणी तरळलं. ‘असू शकतं, आता याबाबत काही सांगू शकत नाही,’ असं भावुक उत्तर देत तिने या विषयावर अधिक बोलणं टाळलं. त्यामुळेच आता या दोघींचे मार्ग वेगळे झाले असून, आज हिंदवीचा स्वतःचा वेगळा डान्स ग्रुप आहे आणि तिनेही अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

सोशल मीडियावर फिरणाऱ्या सर्वच चर्चा शंभर टक्के खऱ्या नाहीत, पण त्यातला काही भाग नक्कीच खरा आहे, असे स्पष्टीकरण हिंदवी पाटीलने दिले.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही