Share

शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या सिनेमात सनी लिओनी ते गौतमी पाटील; ‘त्या’ गाण्यांनी उडवून दिलीय खळबळ!

‘द महाराष्ट्र फाईल्स’ या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या सिनेमात सनी लिओनी, गौतमी पाटील आणि सपना चौधरी यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळणार असल्याने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.

Published On: 

The Maharashtra Files: सनी लिओनी, गौतमीचा तडका!

गंभीर विषयावर सिनेमा बनवायचा आणि त्यात आयटम साँगची फोडणी द्यायची, हे समीकरण तसं नवीन नाही. पण शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या संघर्षासारख्या ज्वलंत विषयावर बेतलेल्या सिनेमात जेव्हा थेट सनी लिओनी आणि गौतमी पाटील एकत्र येतात, तेव्हा चर्चा तर होणारच ना?

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात The Maharashtra Files या बहुचर्चित सिनेमाचीच जोरदार हवा आहे. नुकताच या चित्रपटाचा भव्य म्युझिक लाँच सोहळा मुंबईत पार पडला. एका बाजूला सामान्य शेतकरी कुटुंबाचा न्यायासाठीचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला सपना चौधरी, गौतमी पाटील (Gautami Patil) अन् सनी लिओनीचा (Sunny Leone) ग्लॅमरस तडका, असा भन्नाट प्रयोग या निमित्ताने पाहायला मिळतोय.

The Maharashtra Files

या झगमगत्या सोहळ्यात सपना चौधरीने ‘मार तू शिक्का’ या गाण्यावर ठेका धरला. आनंद शिंदे आणि वैशाली माडे यांच्या आवाजातील हे गाणं सध्या धुमाकूळ घालतंय. तर दुसरीकडे, संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या गौतमी पाटीलवर चित्रित झालेलं ‘छम्मो’ हे गाणं रसिकांच्या पसंतीस उतरत आहे.

पण सोहळ्यात सर्वांच्या भुवया उंचावल्या त्या सनी लिओनीच्या ‘शांताबाई’ या गाण्यामुळे! शेतकऱ्यांचं वास्तव मांडणाऱ्या या सिनेमात या गाण्यांचा नक्की काय संदर्भ असेल, याचीच मोठी उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे. शिवाय, अजय गोगावले यांच्या सुमधुर आवाजातील ‘मन पाखरू’ या गाण्याने उपस्थितांना चांगलीच भुरळ घातली.

या भव्य सोहळ्याला सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, मंगेश देसाई यांसारखी दिग्गज मंडळी उपस्थित होती. दिग्दर्शक संजीवकुमार राठोड यांचा हा सिनेमा येत्या २९ मे २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर धडकणार आहे. तोपर्यंत या ग्लॅमरस तडक्याची चर्चा मात्र सोशल मीडियावर तापलेलीच राहणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही