Share

महेश भट्ट यांचा धक्कादायक खुलासा; सनी लिओनीला पाहताच क्षणी चित्रपट का दिला?

बिग बॉसच्या घरात जाऊन महेश भट्ट यांनी सनी लिओनीला ‘जिस्म २’ साठी कसं साईन केलं, यामागचा मोठा खुलासा समोर आला आहे.

Published On: 

Mahesh Bhatt reveals Sunny Leone casting story in Jism 2

‘जिस्म २’ चित्रपटातून सनी लिओनीने (Sunny Leone) बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली, पण तिला हा चित्रपट कसा मिळाला हे तुम्हाला माहितीये का? यामागची कहाणी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांनी अनेक वर्षांनंतर या कास्टिंगमागचं गुपित उलगडलं आहे. जेव्हा ‘जिस्म २’ ची घोषणा झाली, तेव्हा मुख्य अभिनेत्री ठरलीच नव्हती.

Mahesh Bhatt on Sunny Leone Jism 2

त्या काळात सनी लिओनी ‘बिग बॉस ५’ मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आली होती. वायकॉम १८ चे तत्कालीन सीईओ राज नायक यांनी महेश भट्ट यांना थेट बिग बॉसच्या घरात जाऊन सनीला भेटण्याचा सल्ला दिला. तिथे गेल्यानंतर सनीमधील अभिनयाची क्षमता भट्ट यांच्या लक्षात आली.

त्यानंतर त्यांनी लगेचच निर्माती असलेल्या पूजा भट्टला तिला साईन करण्यास सांगितलं. विशेष म्हणजे, सनी त्याकाळी भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च केली जाणारी व्यक्ती होती. त्यामुळे एका वितरकाने चित्रपट न पाहताच फक्त तिच्या लोकप्रियतेवर त्याचे हक्क मोठ्या रकमेत विकत घेतले होते.

प्रेक्षकांना सनीकडून अत्यंत बोल्ड भूमिकेची अपेक्षा होती. त्यामुळे चित्रपट अपेक्षेप्रमाणे चालला नाही, पण तरीही सुरुवातीच्या तीन दिवसांत तब्बल ३० कोटींची कमाई करून त्याने बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचली. आज सनीने अनुराग कश्यपच्या ‘केनेडी’सारख्या चित्रपटातून स्वतःला सिद्ध केल्याचं म्हणत भट्ट यांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही