छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमधील ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; राजू तडवी बिडकीनचे नवे प्रभारी

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील ५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, राजू तडवी यांच्याकडे बिडकीन पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Published On: 

Police transfer order Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर, ३१ ऑक्टोबर: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील ५ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी शनिवारी (३१ ऑक्टोबर) या बदल्यांचे आदेश जारी केले. यात पोलीस निरीक्षक राजू तडवी यांची बिडकीन पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून या बदल्या तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे. राजू तडवी यांच्यासह नियंत्रण कक्षातील सहायक पोलीस निरीक्षक योगेश धोंडे आणि विनोद वाघ यांचीही बिडकीन पोलीस ठाण्यात नेमणूक झाली आहे. तसेच, नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे यांची सोयगाव पोलीस ठाण्यात, तर सिल्लोड शहरचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे यांची पिशोर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, बिडकीन पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांना तात्काळ नियंत्रण कक्षात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी नवीन ठिकाणी तात्काळ हजर होऊन तसा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयाला सादर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही