एमआयएम नेते इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी; कार्यालयात सापडलेल्या पत्रात धक्कादायक दावे

एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र त्यांच्या कार्यालयात आले आहे. हत्येची सुपारी अहिल्यानगरच्या तरुणाला दिल्याचा उल्लेख पत्रात आहे.

Published On: 

Imtiaz Jaleel criticize BJP

छत्रपती संभाजीनगर, 31 ऑक्टोबर: एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र त्यांच्या कार्यालयात आढळून आले आहे. तुम्हाला कोणत्याही क्षणी मारले जाऊ शकते, असा गंभीर इशारा या पत्रात देण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

या धमकीच्या पत्रात काही धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. जलील यांच्या हत्येची सुपारी अहिल्यानगर येथील एका तरुणाला देण्यात आल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. एवढेच नाही तर, या पत्रात संबंधित तरुणाचे नाव आणि सविस्तर पत्ताही नमूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

इम्तियाज जलील यांनी हे पत्र तात्काळ पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. पत्रातील दाव्यांची सत्यता तपासावी आणि त्यात उल्लेख असलेल्या अहिल्यानगरमधील व्यक्तीची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार पोलीस आता पत्रामागील नेमके कारण, माहितीची विश्वासार्हता आणि संबंधित तरुणाचा खरोखरच याच्याशी काही संबंध आहे का, याचा शोध घेत आहेत.

या प्रकरणावर बोलताना जलील यांनी सांगितले की, यापूर्वीही आपल्याला अनेकदा अशा धमक्या मिळाल्या आहेत आणि आपण अशा धमक्यांना भीक घालत नाही. मात्र, या घटनेच्या निमित्ताने त्यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. शहरात गावठी कट्टे आणि बंदुका खुलेआम आणल्या जात असून, भररस्त्यात हत्या होत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप जलील यांनी केला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही