ठाणे, 19 ऑक्टोबर: शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना रविवारी संध्याकाळी जीवे मारण्याची धमकी आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “घराच्या बाहेर उभा आहे, तुला ठोकून टाकेन,” अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून दिली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आव्हाड यांनी स्वतः त्यांच्या ट्विटर खात्यावरून या धमकीची माहिती आणि संबंधित व्यक्तीचा व्हॉट्सॲप मेसेज शेअर केला आहे. रविवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास 7038841820 या क्रमांकावरून त्यांना दोन-तीन वेळा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. तसेच, आपण घराच्या दरवाजावर उभे असल्याचेही तो म्हणाला.
या प्रकारानंतर आव्हाड यांचे कार्यकर्ते हेमंत वाणी यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी त्या व्यक्तीने वाणी यांनाही धमकी दिली. “आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला पण गोळ्या घालेन,” असे म्हणत आपण घराबाहेर येऊन गेल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. यानंतर हेमंत वाणी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
विद्यमान आमदार आणि पुरोगामी विचारांचे नेते असलेल्या आव्हाड यांना यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. आता आलेल्या ताज्या धमकीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामागे राजकीय हेतू आहे की अन्य काही, याचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.
दरम्यान, मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच ही धमकी आल्याने चिंता वाढली आहे. टायगर श्रॉफ या हल्ल्यातून सुदैवाने बचावला असून सिनेसृष्टीत भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, दिल्लीमार्गे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या टायगर श्रॉफवरील हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अंबानींच्या नवरात्री मेळ्यात धोनीचा साक्षीसोबत खोडकर प्रँक; व्हिडिओ व्हायरल
- भाजपला तामिळनाडूत मोठा धक्का; ‘सिंघम’ के. अन्नामलाई स्थापन करणार नवा राजकीय पक्ष
- मोहम्मद शमीला डावलून बुमराहला विशेष वागणूक का? मोहम्मद कैफने विचारला बीसीसीआयला जाब
Quick Answers
जितेंद्र आव्हाड यांना रविवारी संध्याकाळी अज्ञात व्यक्तीने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यांच्या कार्यकर्त्याचे नाव हेमंत वाणी आहे. संबंधिताने त्यांना "आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला पण गोळ्या घालेन" अशी धमकी दिली.
फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत, "घराच्या बाहेर उभा आहे, तुला ठोकून टाकेन" अशी धमकी दिली.
नाही, याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








