Mumbai : राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) १० प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, अनिश गावंडे, महबूब शेख, हेमाताई पिंपळे आणि प्रवीण कुंटे पाटील यांचा समावेश आहे. हे प्रवक्ते राज्य आणि राष्ट्रीय अशा दोन्ही स्तरांवर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी पार पाडतील.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची (Core Committee) बैठक आज झाली. या बैठकीला पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार डॉ अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, माजी खासदार फौजियाताई खान, राजेंद्रजी शिंगणे, माजी आमदार ॲड. अशोकबापू पवार उपस्थित होते.
Sharad Pawar NCP new spokespersons
माहितीनुसार, पक्षाने या महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या होत्या. यासंदर्भातील एक पत्र शरद पवार यांच्या पक्षाच्या ट्विटर हँडलवर प्रसिद्ध करण्यात आले होते. या पत्रावर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची स्वाक्षरी होती. त्यात नमूद केले होते की, शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने आणि ४ ऑगस्ट २०२६ पासून त्वरित प्रभावाने, पुढील आदेशापर्यंत पक्षाच्या प्रवक्तेपदावरील सर्व पूर्वीच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच, या काळात माजी आमदार श्रीमती विद्या चव्हाण आणि श्री. महेश तापसे हे पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडतील, असे जाहीर करण्यात आले होते आणि संबंधित सर्वांनी याची नोंद घ्यावी, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर, आता पक्षाने नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे.
यामध्ये, जितेंद्र आव्हाड, क्लाईड क्रास्टो, भीमराव हत्तीअंबीरे, अनिश गवांदे, अॅड. फैजल मिर्झा, महेबूब इब्राहीम शेख, प्रवीण कुंटे पाटील, प्रशांत सोनबा वीरकर, अॅड. हेमाताई पिंपळे, डॉ. चंद्रकांत बारेला यांचा समावेश आहे.
📌महत्वाच्या बातम्या
- कोट्यवधींचा दंड, कारवाई मात्र नावापुरती! ७३ कोटींच्या वसुलीसाठी शासनाच्या हाती फक्त ५७ लाखांची मालमत्ता? महसूल विभागाचा अजब कारभार
- रायगडच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; ठाकरे गटाला धक्का, शिंदे गटाला फटका!
- ग्रीनफिल्ड महामार्ग: भूसंपादनावरून करमाडमध्ये राडा; अधिकाऱ्यांच्या उत्तराने मावळला शेतकऱ्यांचा विरोध
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








