Share

रायगडच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; ठाकरे गटाला धक्का, शिंदे गटाला फटका!

रायगडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून महाडचे समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी सुनील तटकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Published On: 

Somnath Ozharde joins NCP | Shivsena UBT

Raigad : शिवसेनेच्या (ठाकरे गट) वाट्याला एकापाठोपाठ एक अनेक धक्के येत आहेत. विधानसभा निवडणुकांनंतर अनेक बड्या नेत्यांनी ‘महायुती’तील घटक पक्षांमध्ये प्रवेश केला. यामध्ये सर्वाधिक नेते शिवसेनेच्या (शिंदे गट) गोटात सामील झाले. अलीकडेच राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात आले, ज्याचा परिणाम म्हणून ठाकरे गटाचे ९ पैकी ६ खासदार शिंदे गटात सामील झाले. शिवसेनेतील सुरुवातीच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बसलेला हा दुसरा मोठा धक्का होता.

परिणामी, आता ठाकरे गटाकडे केवळ तीन खासदार उरले आहेत, तर शिंदे गटाचे संख्याबळ वाढले आहे. अशा परिस्थितीत, ठाकरे गटाला राज्यात आणखी एक मोठा फटका बसला आहे. रायगडमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, जिथे महाड विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक सोमनाथ ओझर्डे (Somnath Ozharde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला आहे.

Somnath Ozharde joins NCP | Shivsena UBT

सुनील तटकरे यांनी महाड मतदारसंघात पालकमंत्री भरत गोगावले यांना आव्हान देण्यासाठी एक रणनीती आखली आहे. त्यांनी गोगावले यांचे कट्टर विरोधक आणि शिवसेना (ठाकरे गट) चे समन्वयक असलेल्या सोमनाथ ओझर्डे यांना आपल्या गोटात सामील करून घेण्यात यश मिळवले आहे. आज ओझर्डे यांनी शिवसेनेचे इतर पदाधिकारी व सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला आणि सुनील तटकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाऊनही, जिल्ह्यातील ‘महायुती’मधील वातावरण अद्यापही फारसे सलोख्याचे असल्याचे दिसत नाही. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी हे सातत्याने तटकरे कुटुंबावर टीका करत असतात. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता आपली ताकद एकवटण्यास सुरुवात केली आहे.

पालकमंत्री भरत गोगावले यांचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या सोमनाथ ओझर्डे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील करून घेत सुनील तटकरे यांनी शिवसेनेला शह दिला आहे. या घडामोडीची सध्या मोठी चर्चा रंगली आहे. राजकारणात ओझर्डे हे गोगावले यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला फटका बसला असला, तरी शिवसेनेच्या शिंदे गटाला मात्र त्याहून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install