FIR होऊन ६ महिने उलटले, तरी सचिन घायाळ मोकाट कसा? राजकीय गौडबंगाल? पोलीस यंत्रणा झोपलीये का?

३० कोटींच्या कर्ज घोटाळ्यात एफआयआर आणि कोर्टाने जामीन नाकारूनही आरोपी सचिन घायाळ ६ महिने पोलिसांना कसे सापडले नाहीत? पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह.

Published On: 

Question mark on police investigation in Sant Eknath Sugar Factory 30 crore loan scam and Sachin Ghayal arrest delay

पैठण | किरण काळे पाटील: एखादा सर्वसामान्य माणूस साध्या चोरीत अडकला, तर पोलीस त्याला रात्रीतून बेड्या ठोकतात. पण तब्बल १६ कोटींच्या थेट अपहाराचा आरोप असलेल्या एका सचिन घायाळला (Sachin Ghayal) पोलीस तब्बल सहा महिने का शोधू शकले नाहीत? पैठणच्या श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यातील ३० कोटींच्या कर्ज घोटाळ्यात आता पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेवरच सर्वात मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

या प्रकरणाचा कायदेशीर घटनाक्रम पाहिला, तर यातलं ‘गौडबंगाल’ अगदी सहज लक्षात येतं. अधिकृत कागदपत्रांनुसार, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे यांनी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात सचिन घायाळ आणि इतरांविरुद्ध रीतसर एफआयआर (गुन्हा क्र. ०६३/२०२६) दाखल केला. त्यानंतर अटकेची टांगती तलवार असल्याने घायाळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. पण ८ मे २०२६ रोजी मा. न्यायमूर्ती मेहरोज के. पठाण यांनी अत्यंत कडक ताशेरे ओढत त्यांचा पहिला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

मे ते ऑगस्ट… पोलीस यंत्रणा झोपली होती का? राजकीय वरदहस्त कोणाचा?

८ मे रोजी हायकोर्टाने जामीन नाकारला, आणि त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी म्हणजे १२ ऑगस्ट रोजी त्यांना दुसऱ्या अर्जावर अंतरिम संरक्षण मिळाले. मग मे ते ऑगस्ट या मधल्या तीन महिन्यांत पोलीस नेमके काय करत होते? १६ कोटींचा अपहार आणि ११२ एकर जमीन पणाला लागल्याचा अधिकृत एफआयआर असताना, हायकोर्टाचे संरक्षण नसतानाही पोलीस मुख्य आरोपीला अटक करू शकले नाहीत.

यात राजकीय धागेदोरे आणि हितसंबंध असण्याची दाट शक्यता आहे. घायाळ यांच्या वकिलांनीच पहिल्या जामीन अर्जाच्या वेळी कोर्टात असा खळबळजनक दावा केला होता की, हा संपूर्ण ‘टेस्ट ऑडिट’चा खटाटोप स्थानिक खासदार संदिपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांच्या राजकीय दबावाखाली सुरू झाला आहे. जर या कारवाईमागे सुरुवातीला एवढा मोठा राजकीय दबाव होता, तर मग प्रत्यक्ष अटकेची वेळ आल्यावर पोलिसांचे हात कोणी बांधले? त्यांना वाचवणारा राजकीय वरदहस्त नेमका कोणाचा होता? हे प्रश्न आता पैठणच्या राजकीय वर्तुळात उघडपणे विचारले जात आहेत.

आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, एमआयडीसी पैठण पोलिसांत दाखल असलेल्या एफआयआरमध्ये केवळ सचिन घायाळ नाही, तर अभिरुची घायाळ, तत्कालीन चेअरमन तुषार शिसोदे आणि कार्यकारी संचालक रोहित लोंढे यांचीही नावे आहेत.

दुसरीकडे, या प्रकरणाच्या तपासात आता मोठी प्रशासकीय खांदेपालट झाली आहे. सुरुवातीला API ईश्वर जगदाळे यांच्याकडे हा तपास होता, त्यांची आता बदली झाली आहे. आता एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्याचे नवे इंचार्ज म्हणून API भारत मोरे यांनी पदभार स्वीकारला आहे.

अखेर १२ ऑगस्ट रोजी कायद्यातील कलम ८३ अंतर्गत झालेल्या नव्या ऑडिट रिपोर्टच्या आधारावर घायाळ यांना १० सप्टेंबरपर्यंत अंतरिम संरक्षण मिळालं आहे. पण फेब्रुवारी ते ऑगस्ट या सहा महिन्यांच्या काळात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी मोकाट कसा राहिला, याचं उत्तर अद्याप कोणाकडेही नाही.

वाचा – संत एकनाथ साखर कारखाना घोटाळा: सचिन घायाळ यांना हायकोर्टाचा अंतरिम जामीन; काय आहे ३० कोटींचा खेळ?

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही