मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. उपोषण सुरू करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, फक्त आपल्याच राज्यात जात पडताळणी समित्या आहेत. देशात इतरत्र कुठेच त्या नाहीत, त्यामुळे त्या बरखास्त करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, मराठा-कुणबी प्रमाणपत्रे जारी झाल्यानंतरही जात पडताळणी समित्यांकडून ती जाणीवपूर्वक रद्द केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
“ज्यांची प्रमाणपत्र प्रलंबित आहेत, ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांनी अंतरवालीमध्ये यावे, अशी हाक मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. अंतरवाली येथे मोठ्या संख्येने लोक जमा होऊ लागले आहेत. मनोज जरांगे यांनी सकाळी १० वाजता उपोषण करण्यास सुरुवात केली आहे.
Manoj Jarange Hunger Strike at Antarwali Sarati
“अधिकारी हे मराठ्यांचा द्वेष करतात. मला मराठा समाजाला सांगायचे आहे की तुमची मुलं अधिकारी बनवा त्यांना समाजाची दया येईल,” असे जरांगे म्हणाले.
“आम्ही तीन वर्षापासून आमच्या मागण्या लेखी स्वरुपात दिल्या आहेत. मात्र, ते वेळकाढूपणा काढत आहे. आम्ही तीन वर्ष वेळ दिला. पण यांच्या नियतीत खोट आहे. त्यामुळे अंमलबजावणीशिवाय माघार नाही, वेळ पडली तर मुंबईला जाऊ, असा इशारा देखील जरंगे यांनी सरकारला दिला.
शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे सर्वांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप, हैद्राबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी, सातारा, कोल्हापूर संस्थाच्या गॅझेटिअरचा जीआर, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, मराठा समाजासाठी मराठा कुणबी स्वतंत्र मंत्रालय, ज्यांना प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेत त्यांना प्रमाणपत्रासोबत लगेचच व्हॅलीडिटी द्यावी, असा अनेक मागण्या मनोज जरांगे यांनी सरकारकडे केल्या आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘कामं पूर्ण झाल्यावर हेच लोक हार घालतील’; फडणवीसांचा विरोधकांना पलटवार
- गोमांस कारवाई! ६३ वर्षांचा आजोबा एकटा २०० किलो गोमांस कसं कापू शकतो? पोलिसांचा ‘माफियांना’ वाचवण्याचा डाव?
- जरांगेंच्या आंदोलनावर भाजप आमदारांचा हल्लाबोल; ‘स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी आंदोलन’












