पक्षांतर करणाऱ्या १३ नगरसेवकांना अपात्र ठरवणार? कैलास पाटलांचा मोठा इशारा

कैलास पाटील यांनी पक्षांतर केलेल्या नगरसेवकांविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.

Published On: 

Kailash Patil Shiv Sena UBT meeting

धाराशिव : शिवसेनेच्या ठाकरे गटाने पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत ‘ॲक्शन मोड’ स्वीकारला आहे. धाराशिव जिल्ह्यातील ‘मशाल’ चिन्हावर निवडून आलेले १३ नगरसेवक आणि ४ पंचायत समिती सदस्य यांनी पक्षांतर केले आहे.

आता ठाकरे गटाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आणि त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी पावले उचलली आहेत. या सर्व बंडखोरांना अपात्र ठरवण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार अशे, असे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले आहे. तसेच, तिथे न्याय न मिळाल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Kailash Patil Shiv Sena UBT meeting

आमदार कैलास पाटील (Kailash Patil) यांची आक्रमक भूमिका आणि कायदेशीर कारवाईचा इशारा यामुळे पक्ष सोडून गेलेले नगरसेवक तसेच पंचायत समितीचे सदस्य हादरून गेले आहेत आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कळंबमधील नगरसेवकांनी भाजपमध्ये, तर धाराशिवमधील नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या बंडखोरीनंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अत्यंत आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, आमदार कैलास पाटील आणि पक्षाच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत एक तातडीची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत निष्ठावान कार्यकर्त्यांनी बंडखोरांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर नंतरच्या काळात पक्षाशी गद्दारी करणे खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट करत या सर्व नगरसेवक व सदस्यांना कायदेशीररीत्या अपात्र ठरवण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.

कलंबमधील नगरसेवकांनी पक्ष सोडल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली. ही घडामोड आमदार कैलास पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही