‘कॉकरोच’ आंदोलनाचा काँग्रेसला मोठा फायदा; भाजपच्या जागा घटणार, सर्व्हेतून धक्कादायक आकडे

India Today-C Voter Survey नुसार NDAला बहुमताचा अंदाज असून भाजपला 261 तर काँग्रेसला 106 जागा मिळण्याची शक्यता आहे.

Published On: 

India Today C Voter survey results

India Today-C Voter Survey : दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ने केलेल्या आंदोलनाचा काँग्रेस (congress) पक्षाला फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. ‘इंडिया टुडे’ आणि ‘सी-व्होटर’ (India Today-C Voter) यांनी केलेल्या सर्वेक्षणात, देशात सध्या निवडणुका झाल्यास संभाव्य निकाल काय असतील, याची आकडेवारी मांडण्यात आली आहे.

या सर्वेक्षणातून असे दिसून येते की, एनडीए (NDA) पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपला (BJP) पूर्वीच्या सर्वेक्षणांइतकाच पाठिंबा मिळताना दिसत नाही. जरी त्यांना बहुमताचा आकडा गाठता येईल असा अंदाज असला, तरीही मागील सर्वेक्षणांच्या तुलनेत त्यांच्या जागांच्या संख्येत घट झाली आहे.

India Today-C Voter survey results

जानेवारीमध्ये एनडीएला २५२ जागा मिळण्याचा अंदाज होता. मात्र गेल्या सहा महिन्यांत त्यांच्या जागांच्या संख्येत २६ ने घट झाली आहे. या सर्वेक्षणानुसार भाजपला २६१ जागा मिळतील, तर काँग्रेसला २६ जागांचा फायदा होईल असा अंदाज आहे. परिणामी, ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाचा काँग्रेसला फायदा होत असल्याची चर्चा आहे. यापूर्वी काँग्रेसला ८० जागा मिळण्याचा अंदाज होता, जो आता वाढून १०६ वर पोहोचला आहे.

सर्वेक्षणातून असेही समोर आले आहे की, जर ‘कॉकरोच जनता पार्टी’ने निवडणूक लढवली, तर ३३ टक्के लोक त्यांना मतदान करण्यास इच्छुक असतील. त्याच वेळी, ४३ टक्के लोकांनी आपण या पक्षाला मतदान करणार नाही असे सांगितले, तर २४ टक्के लोकांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे दर्शवले.

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले असून, ४९ टक्के लोकांनी त्यांना पसंती दर्शवली आहे. राहुल गांधी दुसऱ्या स्थानावर असून २७ टक्के लोकांनी त्यांना पसंती दिली आहे. विशेष म्हणजे, पसंतीच्या बाबतीत तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी तिसरे स्थान पटकावले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही