प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या इतर नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली नाही, यावरून भाजपने केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. कुणी श्रद्धांजली वाहिली नाही म्हणून बाळासाहेबांचे महत्त्व कमी होत नाही, असा पलटवार त्यांनी केला.
या मुद्द्यावर बोलताना राऊत यांनी विचारले की, “कुणी श्रद्धांजली वाहिली नाही म्हणून बाळासाहेबांचे मोठेपण कमी होते का? नाही ना.” बाळासाहेबांचे महत्त्व अबाधित असल्याचे सांगतानाच त्यांनी काँग्रेसच्या कामकाजावरही भाष्य केले. काँग्रेसची आंदोलने थांबलेली नाहीत आणि राहुल गांधी परदेशातून परतल्यानंतर पुन्हा जोमाने कामाला लागतील, अशी माहिती त्यांनी दिली.
अनेक ज्वलंत राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरताना राऊत यांनी मुंबईतील ४० हजार कोटी रुपयांच्या एसआरए घोटाळ्याचा आरोप केला. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर थेट बिल्डरांना पाठीशी घालण्याचा गंभीर ठपका त्यांनी ठेवला आहे. याशिवाय, त्यांनी देशाच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- रविकांत तुपकरांचा मायक्रो फायनान्स आणि बँकांना इशारा; ‘दुष्काळ सोसण्याचा ठेका फक्त शेतकऱ्यांचा आहे का?’
- ‘लेकराचा श्वास कोंडतोय, रस्ता द्या हो…’; ट्रॅफिकमध्ये दीड तास रुग्णवाहिका अडकल्याने चिमुकल्याचा आईच्या कुशीत अंत
- ‘पुन्हा एकदा फाळणी व्हावी’, बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या वक्तव्याने उडाली खळबळ








