उदयपूर, 18 नोव्हेंबर: राजस्थानमधील उदयपूर येथे एका परदेशी महिला पर्यटकासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका ऑटो चालकाने या महिलेला वारंवार ‘लिप किस’ देण्याची मागणी करून तिचा विनयभंग केला. ही महिला यूट्यूबर असून तिच्या लाईव्ह स्ट्रिमिंगदरम्यान हा संपूर्ण घाणेरडा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
ही महिला मूळची थायलंडची असून ती उदयपूरमधील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी आली होती. तिने शहरात फिरण्यासाठी एक ऑटोरिक्षा भाड्याने घेतली होती आणि ती गेल्या दोन-तीन दिवसांपासून याच रिक्षातून प्रवास करत होती. १३ नोव्हेंबर रोजी ती टाऊनहॉल येथील एका यात्रेत गेली होती.
यात्रेमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमांचे ती आपल्या मोबाईलवर लाईव्ह स्ट्रिमिंग करत असतानाच, हा रिक्षाचालक तिच्याजवळ गेला आणि त्याने थेट तिला ‘लिप किस’ देतेस का, अशी विचारणा करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओ संबंधित तरुणीने १४ नोव्हेंबर रोजी तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर अपलोड केला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संताप व्यक्त केला जाऊ लागला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई केली. अबरार खान असे या आरोपी रिक्षाचालकाचे नाव असून तो उदयपूरमधील सेक्टर ११ परिसरातील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शतपावलीसाठी घराबाहेर पडला, आरोपींनी डाव साधला; पंढरपुरात राजाभाऊ भिंगेची गोळ्या झाडून हत्या
- कार्तिकी वारीच्या तोंडावर पंढरपुरात गोळीबार; रेकॉर्डवरील गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
- ॲडलेड स्ट्रायकर्सला मोठा धक्का; सोफी एक्लेस्टोन दुखापतीमुळे WBBL 2026 मधून बाहेर








