Share

तुकाराम मुंढे फार काही वेगळे काम करत नाहीत; समीर वानखेडेंचे विधान चर्चेत

समीर वानखेडे यांनी तुकाराम मुंढे यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, नेटकऱ्यांनी मुंढेंच्या प्रामाणिक कामाचे समर्थन केले आहे.

Published On: 

Tukaram Mundhe and Sameer Wankhede

मुंबई : महाराष्ट्रात असे अनेक प्रामाणिक आणि सडेतोड भूमिका घेणारे अधिकारी आहेत. मात्र, आज अशा अधिकाऱ्यांची संख्या खूपच कमी झाली आहे, याची जाणीव लोकांना आहे. आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) हे अशाच अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीची आणि कारवाई करण्याच्या निर्भय वृत्तीची राज्यभर चर्चा होत आहे.

अन्न व औषध प्रशासनाची (FDA) जबाबदारी स्वीकारल्यापासून भेसळ करणाऱ्यांची झोप उडाली आहे. दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) मुंबईचे माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणतात की, “तुकाराम मुंढे फार काही असाधारण काम करत नाहीयेत, असे तर म्हणालेत.

Tukaram Mundhe and Sameer Wankhede

समीर वानखेडे यांनी नुकतेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, तेव्हा त्यांना तुकाराम मुंढे यांच्याबद्दल विचारण्यात आले. ते म्हणाले, “पहा, मी विशिष्ट अधिकाऱ्यांबद्दल वैयक्तिकरित्या भाष्य करणार नाही. हे आमच्या कामाचाच एक भाग आहे. मी करत असलेले काम असो किंवा ते जे अधिकारी आहेत ज्यांचे तुम्ही नाव घेत आहे, कोणीही चौकटीबाहेर जाऊन काम करत नाहीये. हे आमचे कर्तव्य आहे.

देशाप्रती आमची जबाबदारी आहे आणि खरं तर, त्यासाठीच आम्हाला पगार मिळते. त्यामुळे, आम्हा सर्वांनाच अशी कामे करावी लागतात. त्यामुळे कोणी तरी असे काही ग्रेट काम करत नाही आहे. आमच्या समोर जो मुद्दा आहे ड्रग्जचा, आम्हाला त्याला सामोरे जावे लागेल. आम्हाला ते थांबवावे लागणार. अन्यथा, त्याचे गंभीर परिणाम नवीन पिढीवर आणि तरुणांवर होतील.”

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

समीर वानखेडे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत तुकाराम मुंढे यांना पाठिंबा दर्शविला आहे. एका युजरने कमेंट केली, “पण ज्या पद्धतीने ते काम करत आहेत, तसे काम होणेच अपेक्षित आहे.”

दुसऱ्या एका युजरने त्यांचे वर्णन “सर्वात प्रामाणिक अधिकारी” असे केले. तिसऱ्या एका युजरने म्हटले, “ते बरोबर आहे. ते भ्रष्ट अधिकारी नाहीत. आम्ही त्यांना सलाम करतो. असे प्रामाणिक अधिकारी नेहमीच इतरांपेक्षा वेगळे ठरतात.”

२१ वर्षांत २५ वेळा बदल्या

अधिकारी तुकाराम मुंढे यांचा विचार करता, केवळ त्यांच्या धाडींमुळेच ते चर्चेत असतात असे नाही, तर त्यांच्या कारकिर्दीचा प्रवासही लक्षवेधी आहे. आपल्या २१ वर्षांच्या सेवेदरम्यान त्यांच्या तब्बल २५ वेळा बदल्या झाल्या आहेत. हा आकडा त्यांच्या कामाइतकाच त्यांच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही