P Chidambaram on PM Modi: लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘दिमागी नक्षल’ (Dimagi Naxal) या शब्दाचा उल्लेख करत एक मोठा इशारा दिला होता. पण आता याच शब्दावरून राजकारण चांगलंच तापलंय.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी रविवारी यावर थेट पलटवार केलाय. “होय, मला दिमागी नक्षल असल्याचा अभिमान आहे!” असं खुलं आव्हानच त्यांनी सोशल मीडियावरून (X) दिलंय. यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे.
Dimagi Naxal Row: पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले होते?
८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान मोदींनी नक्षलवादावर कडाडून टीका केली होती. ते म्हणाले होते की, जंगलातील सशस्त्र नक्षलवादाचा बीमोड करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. पण आता खरी लढाई या ‘दिमागी नक्षलां’सोबत (वैचारिक समर्थक) आहे, जे व्यवस्थेत शिरले आहेत.
मोदींच्या मते, हे लोक वर्षानुवर्षे सत्तेच्या वर्तुळात बसून धोरणांमध्ये हस्तक्षेप करत आहेत आणि समाजात अराजकता पसरवण्याची संधी शोधत आहेत. त्यामुळे अशा लोकांना ओळखून त्यांना बाजूला (Isolate) करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी नागरिकांना केलं होतं. २०१४ पासून नक्षलवाद संपवणं हे आपल्या सरकारचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं.
दुसरीकडे… चिदंबरम यांनी पंतप्रधानांच्या या टीकेला थेट अंगावर घेतलं आहे. “माओवादी विचारसरणीच्या लोकांनी सरकारी समित्यांचे सल्लागार म्हणून काम केलंय,” असा गंभीर आरोप मोदींनी केला होता. त्याला उत्तर देताना चिदंबरम यांनी फक्त एका वाक्यात, “I am proud to be a dimagi naxal!” असं लिहित मोदींच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे आता ‘दिमागी नक्षल’ या शब्दावरून येत्या काळात राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी रंगण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- NEET-UG आंदोलनाचे प्रश्न लोकसभेत का नाकारले? सौरभ दास यांचा सरकारवर थेट हल्लाबोल
- शाहरुख, अजय आणि टायगर श्रॉफला तुकाराम मुंढेंचा दणका; १५ दिवसांत स्पष्टीकरण द्या!
- Varanasi Airport Firing: प्रवाशाच्या पिस्तुलातून अचानक गोळी सुटली; कडेकोट सुरक्षेत नेमकं काय घडलं?
- Atif Aslam India Ban: ‘मी भारताला मिस करत नाही!’, १० वर्षांच्या बंदीनंतर आतिफ असलमचा मोठा गौप्यस्फोट












