राहुल गांधींचे फोन टॅपिंगचे आरोप सत्य, ‘वरचा नरेंद्र आणि खालचा देवेंद्र…’ नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात

राहुल गांधींचे फोन टॅपिंगचे आरोप खरे असून, ‘वरचा नरेंद्र आणि खालचा देवेंद्र’ यांनी माझाही फोन टॅप केल्याचा घणाघात नाना पटोलेंनी केला.

Published On: 

Congress will bring disenfranchisement against Devendra Fadnavis in Somnath Suryavanshi death case

प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या फोन टॅपिंगच्या आरोपांचे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ठामपणे समर्थन केले आहे. राहुल गांधींचे फोन टॅप केल्याचे आरोप अजिबात खोटे नसून ती एक वस्तुस्थिती असल्याचे ते म्हणाले. ‘वरचा नरेंद्र आणि खालचा देवेंद्र’ यांनी आपलाही फोन टॅप केल्याची बाब संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, असा घणाघात पटोले यांनी केला.

या प्रकरणाचा संदर्भ देताना पटोले म्हणाले की, ज्या रश्मी शुक्ला यांनी माझा फोन टॅप केला, त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात केंद्रात पाठवण्यात आले होते. मात्र, राज्यात भाजपचे सरकार येताच त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणून डीजी (महासंचालक) पदावर बसवण्यात आले. एवढेच नाही, तर त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ देऊन एकप्रकारे बक्षीसच देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. अशा अधिकाऱ्यांना पोसून विरोधकांचे फोन टॅप करायचे आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचे, असे अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण भाजप करत असल्याची टीका त्यांनी केली.

मतांची चोरी करणे, राम मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण करणे आणि विरोधी पक्षनेत्याचा फोन टॅप करणे या सर्व कृत्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे येऊन उत्तर द्यावे आणि देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. या प्रवृत्तीमध्ये सुधारणा न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारून नरेंद्र मोदींच्या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

तत्पूर्वी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर आपला फोन टॅप केल्याचा गंभीर आरोप केला होता. इन्स्टाग्रामवर एका युझरने त्यांना विचारले होते की, ‘पंतप्रधान मोदी दावा करतात की तुम्हाला परकीय मदत मिळते, तर तुम्ही आरोप करता की परकीय शक्ती पंतप्रधानांना नियंत्रित करत आहेत. या आरोपासाठी तुमच्याकडे काय पुरावा आहे?’ या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी आपल्या फोनकडे बोट दाखवत सर्व पुरावे याच फोनमध्ये असल्याचे सांगितले. आपला फोन टॅप होत असल्यानेच पंतप्रधानांना आपल्याबद्दलची माहिती मिळते, असा दावा त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना थेट आव्हान देत म्हटले की, ज्या दिवशी पंतप्रधान मोदी आपल्यासोबत समोरासमोर चर्चेसाठी तयार होतील, त्या दिवशी परकीय शक्तींच्या नियंत्रणाखाली नक्की कोण आहे, हे सर्वांना स्पष्ट होईल. यासोबतच पंतप्रधान किती काळापासून देशविरोधी कारवायांमध्ये सामील आहेत आणि त्यासंबंधित इतर माहितीही आपण उघड करणार असल्याचे गांधी यांनी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही