करुणा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर? हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा

करुणा मुंडे यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतल्याने त्या लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Published On: 

Dhananjay Munde and Karuna Munde case hearing on 29th March

प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: करुणा मुंडे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झाली असून, तशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची नुकतीच भेट घेतली आहे. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी होणार का आणि भाजपप्रमाणेच आता काँग्रेसमध्येही ‘मुंडे’ नावाची एन्ट्री होणार का, असे सवाल लोकांकडून उपस्थित केले जात आहेत.

सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेसकडून संघटनावाढीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. कथित मतचोरी आणि एसआयआरच्या मुद्द्यांवरून काँग्रेसने मोदी सरकारला धारेवर धरले आहे. राहुल गांधी यांच्यासह राज्यातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून, पक्षाकडून आंदोलनाची हाक दिली जात आहे. अशा आक्रमक पवित्र्यात असलेल्या काँग्रेसमध्ये करुणा मुंडे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मूळच्या मध्य प्रदेशातील इंदूर येथील असलेल्या करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचा आणि त्यांच्याशी २७ वर्षांहून अधिक काळ संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

धनंजय मुंडे यांची कायदेशीर पत्नी असल्याचे सिद्ध करण्यासाठी करुणा मुंडे अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. त्यांनी न्यायालयात स्वीकृतीपत्र, अंतिम इच्छापत्र आणि कौटुंबिक कागदपत्रांसह अनेक पुरावेही सादर केले आहेत. मात्र, धनंजय मुंडे यांच्याकडून आपला हक्क नाकारला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही