दुधाच्या दरात ४ रुपयांची वाढ; १६ नोव्हेंबरपासून नवे दर लागू

कात्रज डेअरीने दुधाच्या दरात प्रतिलिटर ४ रुपयांची वाढ केली असून, १६ नोव्हेंबरपासून ग्राहकांना एक लिटर दुधासाठी ६६ रुपये मोजावे लागणार आहेत.

Published On: 

Milk price hike decision in dairy association meeting Pune

प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना आता आणखी एक आर्थिक झळ बसणार आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडने (कात्रज डेअरी) दुधाच्या दरात प्रतिलिटर ४ रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या १६ नोव्हेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत.

कात्रज डेअरीच्या दूध उत्पादक आणि व्यावसायिक संघाच्या बैठकीत या दरवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यापूर्वी ६२ रुपये प्रतिलिटर असणारे कात्रजचे दूध आता ग्राहकांना ६६ रुपयांना मिळणार आहे. दुधासोबतच दही, ताक आणि पनीर यांसारख्या इतर दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही सुमारे १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरातील ग्राहकांचे घरगुती बजेट कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिला जाणारा खरेदीचा दर आणि ग्राहकांकडून आकारला जाणारा किरकोळ विक्रीचा दर यातील वाढती तफावत हे या दरवाढीचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय पशुखाद्य, वाहतूक, प्रक्रिया आणि उत्पादनाच्या इतर खर्चात मोठी वाढ झाल्याने डेअरी व्यवसायावरील आर्थिक दबाव वाढत होता. याआधी अमूल आणि मदर डेअरीसारख्या प्रमुख ब्रँड्सनीही आपल्या दरांमध्ये वाढ केली होती, त्याच पार्श्वभूमीवर कात्रज डेअरीने हे पाऊल उचलले आहे.

या निर्णयाबाबत माहिती देताना संघटनेचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी स्पष्ट केले की, वाढीव खरेदीदरामुळे शेतकरी वर्गाला मोठा आधार मिळणार आहे. ते म्हणाले, “तुकाराम मुंढेंच्या कारवाईमुळे दुधात अमुलाग्र बदल झाले आहेत. आमच्या पनीरच्या किमतीत वाढ झाली असून, सध्या आम्हाला दुधाची गुणवत्ता अतिशय चांगली मिळत आहे.”

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही