मुंबई, 13 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणाची चर्चा आणि गुप्त बैठका सुरू असतानाच, मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर लागलेल्या एका रहस्यमय पोस्टरने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या पोस्टरवर ‘अजितदादांच्या (Ajit Pawar) अपघात आणि घातपात मागे असलेल्यांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण?’ असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
या पोस्टरमध्ये राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत भाष्य करण्यात आले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर अद्यापही काही प्रश्न अनुत्तरित असल्याचा दावा करत, या अपघातामागील सूत्रधारांना पाठीशी घालणारा नेता नेमका कोण, अशी विचारणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पोस्टरवर एका मफलरचे चित्र छापण्यात आले असून, यामुळे एका विशिष्ट नेत्याकडे अंगुलीनिर्देश केला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
येत्या १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता कोणता ‘राजकीय बॉम्ब’ फुटणार, असा उल्लेखही या पोस्टरमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आता मफलरवाला नेता कोण आणि या रहस्यमय पोस्टरमागे नेमके कोणाचे डोके आहे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
१६ तारखेला नेमका कोणता नेता पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा खुलासा करणार आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत कोणती नवीन माहिती उघड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मफलर घातलेल्या व्यक्तीच्या चित्रातून कोणाला लक्ष्य करण्यात आले आहे, याचे उत्तरही आता १६ नोव्हेंबरलाच मिळण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- रोहित शर्मा आणि इशान किशनच्या चुकीमुळे विल यंगला दोन जीवदान, आकिब नबी संतापला
- दुधाच्या दरात ४ रुपयांची वाढ; १६ नोव्हेंबरपासून नवे दर लागू
- इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच घडलं! एकाच एकदिवसीय सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा शून्यावर बाद








