अकोला, 25 ऑक्टोबर: राज्यातील २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार होते. काँग्रेसच्या ७५ आमदारांसह मविआचे १६० उमेदवार विजयी होतील, असा महत्त्वपूर्ण अहवाल ‘इंटेलिजन्स ब्युरो’ने (IB) दिला होता. हा अहवाल सरकार आणि विरोधी पक्षांनाही देण्यात आला होता, असा खळबळजनक दावा नाना पटोले यांनी केला आहे.
मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेनंतर वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीवर संशय व्यक्त करत पटोले यांनी सरकारवर गंभीर आरोप केला. बोगस मतदानाच्या आकडेवारीतून महाविकास आघाडीला सत्तेपासून रोखण्याचा कट रचला गेल्याचा दावा त्यांनी केला. यासोबतच आगामी काळात महागाईचा मोठा भडका उडणार असून, पेट्रोलचे दर ४०० रुपयांचा टप्पा ओलांडतील असा अंदाज आणि भीती त्यांनी (Nana Patole) यावेळी व्यक्त केली.
काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या देशातील पाच माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षात ‘घरवापसी’बाबत सध्या चर्चा सुरू असून त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचेही नाव घेतले जात आहे. यावर बोलताना पटोले म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्या संदर्भात राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात मोठा राग आहे. देशातील वातावरण बदलत असल्याने अनेकांना पुन्हा काँग्रेसच्या मूळ प्रवाहात येण्याची उत्सुकता आहे, मात्र चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांच्या काँग्रेस प्रवेशावर ‘हायकमांड’च अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे प्रस्तावित असलेल्या ३०० हजार मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पासाठी होणाऱ्या जंगलतोडीवरून पटोले यांनी मोदी आणि फडणवीस सरकारला गंभीर इशारा दिला. या प्रकल्पासाठी ३५ हजारांहून अधिक झाडे तोडली जाणार असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकल्पाचे कंत्राट असलेल्या ‘टोरंट कंपनी’चा प्रमुख मेहता नावाचा व्यक्ती अमित शहा यांचा जवळचा असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मोदी आणि फडणवीस सरकारला आपण महाराष्ट्राचे वाळवंट करू देणार नाही, असा ठाम विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. कर्जत येथील वृक्षतोड तत्काळ न थांबल्यास काँग्रेसच्या वतीने तेथे मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा नाना पटोले यांनी सरकारला दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून किरॉन पोलार्डने सांगितली पहिली प्राथमिकता; चाहत्यांसाठी दिला खास संदेश
- “तिलक वर्मा आणि रेड्डीने अत्यंत खंबीरपणा दाखवला”: न्यूझीलंडवरील रोमहर्षक विजयानंतर श्रेयस अय्यरने केले फलंदाजांचे कौतुक
- बिहारमध्ये मोठी घडामोड! बंडखोरी भोवली, आमदार अनंत सिंह यांची जेडीयूमधून ६ वर्षांसाठी हकालपट्टी
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








