प्रतिनिधी, 25 ऑक्टोबर: बिहारमधील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून, विधान परिषद निवडणुकीत बंडखोरी केल्याप्रकरणी जनता दल युनायटेडने (जेडीयू) कठोर पाऊल उचलले आहे. पक्षाच्या उमेदवाराविरोधात दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत, मोकामा मतदारसंघाचे आमदार अनंत सिंह यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.
जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाहा यांनी ही धडक कारवाई केली असून, अनंत सिंह यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निष्कासित करण्यात आले आहे. या कारवाईचा फटका केवळ अनंत सिंह यांनाच नव्हे, तर त्यांच्या पत्नी आणि माजी आमदार नीलम देवी यांनाही बसला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून, बिहारमधील मातब्बर नेते मानल्या जाणाऱ्या अनंत सिंह यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर जेडीयूने आता अनंत सिंह यांच्याविरुद्ध आणखी कडक भूमिका घेतली आहे. त्यांची विधानसभा सदस्यता तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी अधिकृत शिफारस पक्षाने केली असून, याबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्रही पाठवण्यात आले आहे.
पक्षश्रेष्ठींनी थेट विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकी रद्द करण्याची मागणी केल्यामुळे अनंत सिंह यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. आता या शिफारशीवर विधानसभा अध्यक्ष नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- म्हाडाच्या ८१४ सदनिका आणि भूखंड हडप प्रकरण; २३ बिल्डरांची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
- ‘लाडकी बहीण’नंतर आता एकल महिलांसाठी मोठी योजना; चंद्रकांत पाटलांची घोषणा, १२ लाख जणींना मिळणार आधार!
- प्राजक्ता हनमघरची ट्रोलर्सना सणसणीत चपराग; ‘तू हिजडा आहेस’ म्हणणाऱ्याला दाखवली त्याची जागा
Quick Answers
विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरोधात दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत अनंत सिंह यांची जेडीयूमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.
अनंत सिंह यांच्या पत्नी आणि माजी आमदार नीलम देवी यांनाही पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
अनंत सिंह यांची विधानसभा सदस्यता तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी अधिकृत शिफारस जेडीयूने विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवून केली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








