छत्रपती संभाजीनगर: सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या ८१४ सदनिका आणि ७१ हजार १३४ चौरस मीटर विकसित भूखंड परस्पर हडप करणाऱ्या शहरातील २३ बड्या बिल्डरांविरुद्ध गुन्हे शाखेने (MHADA Scam) सखोल तपास सुरू केला आहे. म्हाडाचे मुख्य अधिकारी वैभव केदारे यांनी दिलेल्या तक्रारीची पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे.
म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा विभागाच्या अहवालानंतर पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी थेट गुन्हे शाखेकडे सोपवली आहे. पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्याकडे हा तपास देण्यात आला असून, त्यांनी म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारीत नमूद सर्व बिल्डरांच्या मूळ कागदपत्रांसह हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. गुन्हे शाखेने म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळातील नगररचना व गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण केले आहे.
संबंधित २३ विकासकांनी ले-आउट मंजूर करताना दिलेली हमीपत्रे, तसेच यूडीसीपीआर २०२० च्या नियम ३.८.२ नुसार २० टक्के सदनिका व भूखंड म्हाडाला हस्तांतरित न करता परस्पर ग्राहकांना कसे विकले, याची पडताळणी पोलिस करणार आहेत. याशिवाय रेरा नोंदणीचीही माहिती तपासली जाणार आहे. या सर्व कागदपत्रांच्या तांत्रिक व कायदेशीर पडताळणीनंतर म्हाडाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत रीतसर फिर्याद नोंदवून फसवणूक, विश्वासघात आणि अपहाराचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
सदनिका न देणारे प्रकल्प:
१. मे. नमो रियल्टीतर्फे भागीदार अमीन अब्दुला सुराणी व कमरुद्दीन करीम भारवाणी (गट क्र. १३७ भाग, सातारा – २३ सदनिका)
२. दिलीपकुमार रमणलालजी बाकलीवाल व इतर (गट क्र. ३९ भाग, सातारा – १०८ सदनिका)
३. सम्यक निवास हक्क संघ, प्रायोजक भिम फाऊंडेशनतर्फे अध्यक्ष मधुकर विठ्ठल सूर्यवंशी व इतर (गट क्र. ११/२, भावसिंगपुरा – ३६ सदनिका)
४. त्रिलोकसिंग तारासिंग जर्बिदा (गट क्र. २६/पैकी, शहानूरवाडी, मौजे सातारा – २८ सदनिका)
५. मे. पीयूष इन्फ्राप्रोजेक्ट प्रा.लि. तर्फे प्रल्हाद हरीराम पन्हाळे (गट क्र. २३ व २५/पैकी, शहानूरवाडी – १२ सदनिका)
📌 महत्वाच्या बातम्या
- प्राजक्ता हनमघरची ट्रोलर्सना सणसणीत चपराग; ‘तू हिजडा आहेस’ म्हणणाऱ्याला दाखवली त्याची जागा
- KBCच्या मंचावर माधुरी दीक्षितचा सातारी बाणा; नवऱ्यासाठी घेतलेला ‘तो’ उखाणा ऐकून कलाकारही लोटपोट!
- “मराठे स्टुडिओ फोडून सुशील कुलकर्णीला चोपतील असं वाटलं होतं”; सुषमा अंधारेंचा घणाघात
Quick Answers
सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या ८१४ सदनिका आणि ७१ हजार १३४ चौरस मीटर विकसित भूखंड परस्पर हडप केल्याचा आरोप शहरातील २३ बिल्डरांवर आहे.
या प्रकरणाची प्राथमिक चौकशी गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली असून पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्याकडे हा तपास देण्यात आला आहे.
संबंधित २३ विकासकांनी ले-आउट मंजूर करताना दिलेली हमीपत्रे, यूडीसीपीआर २०२० च्या नियमांनुसार २० टक्के सदनिका व भूखंड म्हाडाला हस्तांतरित न करता परस्पर ग्राहकांना कसे विकले, तसेच त्यांच्या रेरा नोंदणीची माहिती पोलिस तपासणार आहेत.
या प्रकरणात म्हाडाचे मुख्य अधिकारी वैभव केदारे यांनी तक्रार दिली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








