KBCच्या मंचावर माधुरी दीक्षितचा सातारी बाणा; नवऱ्यासाठी घेतलेला ‘तो’ उखाणा ऐकून कलाकारही लोटपोट!

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर माधुरी दीक्षितने डॉ. श्रीराम नेनेंसाठी सातारी स्टाईलमध्ये भन्नाट उखाणा घेतला, ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Published On: 

Madhuri Dixit ukhana on Kon Honaar Crorepati stage with Hasyajatra team

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार एकाच मंचावर आले की काय कल्ला होऊ शकतो, याची प्रचिती नुकतीच आली आहे. ‘कोण होणार करोडपती’च्या (Kon Honaar Crorepati) सेटवर चक्क ‘धक धक गर्ल’चा एक भन्नाट सातारी अंदाज पाहायला मिळाला आणि सेटवर एकच हशा पिकला.

सध्या माधुरी दीक्षित ‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोचं सूत्रसंचालन करत आहे. या मंचावर आतापर्यंत अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे, पण जेव्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमने या मंचावर एन्ट्री घेतली, तेव्हा अक्षरशः धम्माल उडाली. या विशेष भागाचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत.

Madhuri Dixit Ukhana KBC

या विशेष भागात हॉटसीटवर कॉमेडीचे बादशाह समीर चौघुले आणि प्रियादर्शनी इंदलकर बसले होते. त्याचवेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या रोहित मानेने माधुरीकडे एक खास फर्माईश केली. “मॅडम, सातारी भाषेचा लहेजा पकडून तुम्ही डॉ. नेनेंसाठी एक उखाणा घ्यावा,” अशी गमतीदार इच्छा त्याने व्यक्त केली. त्याच्या या मागणीवर संपूर्ण सेटवर टाळ्यांचा कडकडाट झाला.

चाहत्यांचा आग्रह आणि रोहितची फर्माईश ऐकून माधुरीनेही मागेपुढे न पाहता थेट सातारी स्टाईलमध्ये उखाणा घेतला. “एक होती चिऊ, एक होता काऊ… एक होती चिऊ, एक होता काऊ… डॉक्टरांचं नाव घेते, आता डोकं का खाऊ!” हा भन्नाट उखाणा ऐकताच उपस्थित सर्वांची हसून हसून पुरेवाट झाली.

माधुरीच्या या मिश्किल आणि हटके अंदाजाने सध्या सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. हास्यजत्रेच्या कलाकारांसोबत माधुरीने मनसोक्त गप्पा मारल्या असून, या मजेशीर क्षणांचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती' या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही