प्रतिनिधी, 24 ऑक्टोबर: आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनात नुकताच सहभाग घेतल्यानंतर, आता त्यांनी सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उघडपणे आवाज उठवला आहे.
भाजपवर हल्लाबोल करताना शाह यांनी अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. “बंगालच्या निवडणुकीतील फसव्या विजयानंतर हा खोटा पक्ष आता त्यांच्या धोरणांशी आणि विचारधारेशी सहमत नसलेल्या सर्वांवर सूड उगवण्यासाठी टपला आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.
या सूडाचे ताजे बळी सत्यजित रे इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी आणि नवोदित चित्रपट निर्माते असल्याचं शाह यांनी म्हटलं आहे. प्रशासनाकडून या विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणे, पाळत ठेवणे, धमकावणे आणि वसतिगृह रिकामे करण्यास सांगणे यावर त्यांनी बोट ठेवलं. “भाजप केवळ स्वतःच्या बाजूने निर्लज्ज प्रचार करून समाधानी नाही, तर त्यांना आता लोकांचं ब्रेनवॉश करायचं आहे किंवा त्यांना घाबरवायचं आहे,” असे शाह म्हणाले.
नसिरुद्दीन शाह यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जुलैमध्ये सरन्यायाधीशांच्या ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईलाही त्यांनी कडाडून विरोध दर्शवला होता. त्यावेळी आंदोलकांवरील हिंसाचाराचा निषेध करताना त्यांनी कारवाई करणाऱ्यांची तुलना थेट अमेरिकेच्या ‘आयसीई’ (ICE) एजंट्सशी केली होती.
इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी तरुण आंदोलकांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल राग व्यक्त केला होता आणि देशातील तरुणांबद्दलची आपली आशा अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट केले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, “जर एखादी अज्ञानी व्यक्ती या देशाचे नेतृत्व करत असेल, तर संपूर्ण देशाने त्याच्यासारखंच अज्ञानी, मूर्ख आणि हृदयहीन व्हावं, अशी त्याची इच्छा असते.”
📌 महत्वाच्या बातम्या
- अर्शदीप सिंगने मोडला भुवनेश्वर कुमारचा विक्रम, टी-२० विश्वविक्रमाच्याही उंबरठ्यावर
- ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवर खासदार श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मी त्याला शोधायला…’
- अभिषेक शर्माचा ऐतिहासिक विक्रम; टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
Quick Answers
नसिरुद्दीन शाह यांनी सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उघडपणे आवाज उठवला आहे.
नसिरुद्दीन शाह यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणे, त्यांच्यावर पाळत ठेवणे, धमकावणे आणि वसतिगृह रिकामे करण्यास सांगणे यांसारख्या गोष्टी केल्या जात आहेत.
नसिरुद्दीन शाह यांनी यापूर्वी जुलैमध्ये सरन्यायाधीशांच्या ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईला कडाडून विरोध दर्शवला होता.
आंदोलकांवरील हिंसाचाराचा निषेध करताना त्यांनी कारवाई करणाऱ्यांची तुलना थेट अमेरिकेच्या 'आयसीई' (ICE) एजंट्सशी केली होती.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








