प्रतिनिधी, 24 ऑक्टोबर: न्यूझीलंडविरुद्ध ख्राईस्टचर्च येथील हॅगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. संजू सॅमसनसोबत डावाची आक्रमक सुरुवात करताना अभिषेकने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पॉवरप्लेमध्ये आपले १०० षटकार पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेटच्या इतिहासातील जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
अभिषेक शर्माने अवघ्या ७७६ चेंडूंमध्ये पॉवरप्लेमधील १०० षटकार पूर्ण करून भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे. रोहितच्या नावावर पॉवरप्लेमध्ये १६७२ चेंडूंमध्ये ९८ षटकार आहेत. तर, न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने १६०९ चेंडूत ९७ षटकार मारले आहेत. इशान किशनच्या पुनरागमनानंतर अभिषेक हा भारताचा दुसरा सर्वोत्तम फलंदाज ठरला असून, तो सध्या आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तत्पूर्वी, पहिल्या टी-२० सामन्यातही अभिषेक आणि संजू सॅमसनने पॉवरप्लेमध्ये ९३ धावांची दमदार भागीदारी केली होती. या भक्कम सुरुवातीच्या जोरावर भारतीय संघाने २२६ धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला. यामुळेच भारताला या मालिकेत आघाडी घेणे शक्य झाले.
याच डावादरम्यान अभिषेक शर्माने २०२६ या वर्षात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पाही ओलांडला. इशान किशननंतर या वर्षात १००० हून अधिक धावा करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू बनला आहे. अभिषेकसाठी हे वर्ष चढ-उतारांचे राहिले असून त्याने नुकतेच आयसीसी टी-२० क्रमवारीतील आपले अव्वल स्थान गमावले आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती, मात्र वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याला केवळ एक अर्धशतक झळकावता आले. नुकत्याच झालेल्या सामन्यांमध्ये चांगली सुरुवात मिळूनही तिचे मोठ्या खेळीत किंवा अर्धशतकात रूपांतर करण्यात तो अपयशी ठरला आहे. त्यामुळे या मालिकेत काही मोठ्या खेळी साकारण्याचा अभिषेकचा प्रयत्न असेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगे पाटलांना ५०० कोटी रुपये पोहोचवले? ऑडिओ क्लिपच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
- लाडकी बहीण योजनेनंतर आता एकल महिलांसाठी नवीन योजना; १२ लाख जणींना मिळणार आर्थिक आधार
- मुंढवा जमीन घोटाळा: आर्थिक गुन्हे शाखेकडून पार्थ पवार यांना नोटीस
Quick Answers
अभिषेक शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पॉवरप्लेमध्ये आपले १०० षटकार पूर्ण केले असून अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
अभिषेक शर्माने अवघ्या ७७६ चेंडूंमध्ये पॉवरप्लेमधील १०० षटकार पूर्ण करत भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडला.
रोहित शर्माच्या नावावर पॉवरप्लेमध्ये १६७२ चेंडूंमध्ये ९८ षटकार, तर न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलच्या नावावर १६०९ चेंडूत ९७ षटकार आहेत.
इशान किशननंतर २०२६ या वर्षात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० हून अधिक धावा पूर्ण करणारा अभिषेक शर्मा हा दुसरा भारतीय खेळाडू बनला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








