संजय शिरसाटांच्या बंगल्यावर हल्ला करणारे ते ३ तरुण कोण? पोलिसांनी दिली सविस्तर माहिती

मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर दगडफेक आणि बाटल्या भिरकावल्याप्रकरणी ३ तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Published On: 

Sanjay Shirsat house attack three accused youths arrested by police

छत्रपती संभाजीनगर, 13 नोव्हेंबर: शिवसेनेचे नेते, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या घरावर मध्यरात्री झालेल्या हल्लाप्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे. गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गोलवाडी परिसरातील शिरसाट यांच्या निवासस्थानी या तरुणांनी दगडफेक करत काचेच्या बाटल्या फेकल्या होत्या.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. संशयितांना पकडण्याच्या प्रयत्नात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी या हल्लेखोरांबद्दल सविस्तर माहिती दिली. प्राथमिक तपासात या तिघांचाही कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड आढळलेला नाही. यातील दोन तरुणांचे एमएससी आणि एकाचे बीकॉमपर्यंतचे शिक्षण झाले आहे. पोलीस या तिन्ही तरुणांची अधिक चौकशी करत असल्याचे नवले यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या हल्ल्यानंतर संजय शिरसाट यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला. पोलीस आयुक्तांचा फोन बंद होता आणि एकही डीसीपी किंवा एसीपी घटनास्थळी पोहोचले नाही, असा आरोप त्यांनी केला. ‘पालकमंत्र्यांच्या घरावर हल्ला होतोय, त्याची तरी दखल घ्या,’ अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना सुनावले. अखेर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

शिरसाट यांच्या आरोपांवर पोलीस उपायुक्त नवले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ११२ क्रमांकावर माहिती मिळाल्यानंतर अवघ्या चार ते पाच मिनिटांत पोलिसांची गाडी घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी तरुणांना ताब्यात घेतले. त्यानंतर स्थानिक पोलीस निरीक्षक, स्वतः डीसीपी, उस्मानपुऱ्याचे एसीपी आणि इतर अधिकारीही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते, असे नवले यांनी सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही