राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भुजबळांचा दावा खराच असावा; चर्चेचे साक्षीदार असल्याचं सुनील तटकरेंचं वक्तव्य

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत छगन भुजबळ यांनी केलेल्या दाव्याला सुनील तटकरे यांनी दुजोरा दिला असून, भुजबळ या चर्चेचे साक्षीदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Published On: 

Sunil Tatkare talking about NCP merger and Chhagan Bhujbal's statement

मुंबई, 13 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या दाव्यावर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ हे ज्येष्ठ नेते असून ते विलीनीकरणाबाबत बोलत असतील तर ते खरेच असावे, असे तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले आहेत. तसेच, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात झालेल्या चर्चेचे भुजबळ साक्षीदार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

छगन भुजबळ यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. आजारी असताना त्यांची विचारपूस करण्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील त्यांच्याकडे गेले होते. याच भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये ४० ते ४५ मिनिटे विलीनीकरणावर चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला होता. त्यावेळी आपण स्वतः पुढाकार घेत अजित पवार चांगले नेतृत्व करत असून सर्वांनी पुन्हा एकत्र यायला हवे, अशी भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले होते.

भुजबळांच्या या प्रस्तावावर जयंत पाटील यांनी आक्षेप नोंदवला होता. सध्या तुम्ही एनडीएसोबत सत्तेत आहात, त्यामुळे तुमच्या मित्रपक्षांना हे एकत्रीकरण मान्य होईल का, असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यावर शरद पवार आणि अजित पवार चर्चा करून मार्ग काढतील, असे उत्तर भुजबळ यांनी दिले होते. मात्र, या ४० मिनिटांच्या चर्चेनंतर पुढे कोणतीही हालचाल झाली नसल्याचे भुजबळांनी म्हटले आहे.

या घडामोडींवर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, ‘अजित पवार आज असते तर निश्चितच १२ फेब्रुवारी रोजी विलीनीकरण झाले असते,’ असे आपण तत्कालीन परिस्थितीनुसार बोललो होतो, असे तटकरे म्हणाले. तसेच, सध्या शरद पवारांची प्रकृती ठीक नसल्याने अनेकजण त्यांची भेट घेत आहेत. परंतु, शरद पवारांची भेट घेणे म्हणजे विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे असा त्याचा अर्थ होत नसल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही