सुनील तटकरेंना ‘व्हिलन’ का ठरवताय? विलिनीकरणाच्या चर्चेवर आदिती तटकरेंनी दिली वडिलांची साथ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून सुनील तटकरे यांच्यावर होणाऱ्या टीकेला मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिले असून वडिलांची पाठराखण केली आहे.

Published On: 

Aditi Tatkare defending Sunil Tatkare over NCP merger talks

नंदुरबार, 13 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेवरून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना ‘व्हिलन’ ठरवले जात असल्याबद्दल राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नंदुरबार दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या वडिलांची पाठराखण करत विरोधकांना खडेबोल सुनावले.

शरद पवार गटाकडून सध्या सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. पूर्वी विलिनीकरणाच्या चर्चेला विरोध करणारे तटकरे आता त्यावर का बोलत आहेत, असा सवाल करत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. यावर मुलगी म्हणून प्रतिक्रिया देताना आदिती तटकरे म्हणाल्या की, त्यांना व्हिलन ठरवणे अत्यंत दुर्दैवी आहे. अजितदादा आणि सुनील तटकरे यांची मैत्री राष्ट्रवादीच्या स्थापनेपूर्वीपासून, म्हणजेच काँग्रेसमध्ये असल्यापासूनची आहे. दोघांनी अनेक संकटांचा एकत्र सामना केला असून त्यांच्या मैत्रीत कधीही दुरावा आला नाही. ‘आता दादा नाहीत, पण मित्र आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरे आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडत राहतील,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून आमदारांना विलिनीकरणासाठी फोन येत असल्याच्या चर्चांबद्दल विचारले असता, आपल्याला असा कोणताही फोन आला नसल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले. सध्या बातम्या आणि शंका-कुशंकांचे पेव फुटले असले तरी, आपण आपल्या मंत्रीपदाच्या विभागाकडे अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच, विलिनीकरणासारख्या मोठ्या मुद्द्यावर थेट भाष्य करणे टाळत, आपण एक छोटी कार्यकर्ती असून यावर शरद पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे हेच निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्या म्हणून सुनेत्रा काकींच्या नेतृत्वात त्या जी भूमिका घेतील ती आपल्याला मान्य असेल, असेही त्यांनी नमूद केले.

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांचाही आदिती तटकरे यांनी खरपूस समाचार घेतला. कदम यांची टीका अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह असल्याचे त्या म्हणाल्या. महायुतीचे सरकार तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली राज्याला पुढे नेत असून, मित्रपक्षांनी एकमेकांवर चिखलफेक करून महायुतीत मिठाचा खडा टाकू नये, असा सल्ला त्यांनी दिला. आघाडीचा धर्म पाळणे ही केवळ एकाची नाही तर दोन्ही बाजूंची जबाबदारी असून, ज्येष्ठ नेत्यांनी एकमेकांवर टीका करणे टाळल्यास सरकार अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकेल, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही