विलीनीकरणाच्या चर्चेवर सुनेत्रा पवारांचे सूचक वक्तव्य; म्हणाल्या, ‘जशी वेळ येईल तशा…’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी ‘जशी वेळ येईल तशा गोष्टी कळतील’ अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

Published On: 

Sunetra Pawar and Sharad Pawar during NCP political developments

मुंबई, 11 नोव्हेंबर: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना प्रचंड वेग आला आहे. अजित पवार गटाचे आमदार ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी बारामती येथे माध्यमांशी बोलताना एक सूचक विधान केले आहे.

माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “सध्या तुम्ही एका वेगळ्या विषयाबाबत उत्सुक आहात हे मला माहीत आहे, पण जशी वेळ येईल तशा गोष्टी आपल्याला कळतीलच.” दुसरीकडे, शरद पवार आज कुणालाही भेटणार नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, आमचे आमदार शरद पवारांना भेटायला जाणार नसून विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असल्याचे सांगत, पक्षहितासाठी त्या जो काही निर्णय घेतील तो अजितदादांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मान्य असेल असे म्हटले आहे. ‘नेत्यांपेक्षा कार्यकर्ता महत्त्वाचा’ हे ब्रीदवाक्य त्यांनी पूर्वीही जपले असून आजही जपत आहेत. पक्ष आणि महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेण्यास त्या सक्षम व खंबीर असल्याचे मिटकरींनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार विलीनीकरणासाठी शरद पवारांची भेट घेणार असल्याच्या बातम्या आमदार अनिल भाईदास पाटील यांनी फेटाळून लावल्या आहेत. प्रसारमाध्यमांतील विलीनीकरणाच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे ते म्हणाले. पार्थ पवार यांनी दिवाळी आणि प्रकृतीच्या विचारपूससाठी तर प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार रुग्णालयात असताना महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांची भेट घेतली होती. अनेक वर्षे सोबत काम केल्याने विचारपूस करण्याची संस्कृती असून यात विलीनीकरणाची कोणतीही चर्चा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या कोणत्याही आमदारांनी शरद पवारांना भेटण्यासाठी वेळ मागितली नसल्याचे आणि तसा कोणताही निरोप नसल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले. शरद पवार हे ज्येष्ठ आणि देशव्यापी नेते आहेत, त्यांच्या हाताखाली अनेक आमदारांनी व कार्यकर्त्यांनी वर्षे काम केले आहे. त्यामुळे ते रुग्णालयातून सुखरूप बरे होऊन आल्यावर त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी जायला कोणाची हरकत नसावी. वेळ आली तर प्रकृतीची विचारपूस करायला जाऊ पण शकतात, असेही ते म्हणाले. मात्र, सध्या बहुतांश आमदार आपापल्या मतदारसंघात असल्यामुळे शरद पवारांना भेटायला जायचे असे अद्याप काहीही ठरलेले नाही, अशी माहिती पाटील यांनी दिली.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही