प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: खासदार ओमराजे निंबाळकर आणि एका चिमुकल्यामधील संवादाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सामान्य नागरिकांचे फोन उचलण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ओमराजेंना या क्लिपमध्ये एका लहान मुलाने थेट फोन करून गावातील खराब रस्त्यांबद्दल जाब विचारला आहे.
व्हायरल क्लिपमध्ये हा मुलगा स्वतःची ओळख ‘सौंदना, आंबामधून सुमंत पाळकर बोलतोय’ अशी करून देतो. दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यानंतर ओमराजेंनी त्याला फोन करण्याचे कारण विचारले. त्यावर मुलाने, “आमच्या गावचे रस्ते कधी नीट करणार?” असा थेट प्रश्न केला. यावर खासदार म्हणाले की, ते सध्या दुष्काळाच्या प्रश्नाकडे वळले आहेत.
मुलाने खासदारांना “तुमच्याकडे पैसे असतील की?” असे विचारले. ओमराजेंनी तो शासनाचा पैसा असल्याचे सांगितल्यावर, “मग करा की नीट लवकर. माझ्या मामाची गाडी घासली गेली,” अशी तक्रार या चिमुकल्याने केली. मामाच्या गाडीची काळजी ऐकून ओमराजेंनी त्याला गमतीने विचारले, “तुला मामाची लय काळजी आहे, मामाला काय पोरगी बिरगी आहे का?”
या प्रश्नावर मुलगा हसतो आणि ‘नाही’ म्हणतो. त्यावर “तू फार लांबची तयारी करून ठेवली आहेस, आपण करू नीट करू,” असे आश्वासन निंबाळकर देतात. या संवादाची सर्वत्र चर्चा असली तरी, या क्लिपला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.
📌 महत्वाच्या बातम्या
- सय्यद मुश्ताक अली करंडक २०२६-२७ साठी केरळच्या संघाची घोषणा; संजू सॅमसनकडे पुन्हा कर्णधारपद
- पाकिस्तान-श्रीलंका दुसरी कसोटी लाहोरहून रावळपिंडीला हलवली; सामन्याच्या तारखा मात्र कायम
- उस्मान ख्वाजाकडून लॉर्ड्सवरील ‘त्या’ घटनेवर मौनभंग, एमसीसी सदस्यांवर वर्णद्वेषी शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








