मनोज जरांगेंना सपोर्ट का करत नाही? मराठा तरुणाचा खासदार ओमराजेंना थेट सवाल, ऑडिओ क्लिप व्हायरल

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा न दिल्यावरून एका मराठा तरुणाने खासदार ओमराजे निंबाळकरांना फोनवरून जाब विचारल्याची ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल होत आहे.

Published On: 

Omraje Nimbalkar and Manoj Jarange Patil audio clip viral.

जालना, 14 सप्टेंबर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 17 वा दिवस आहे. 19 सप्टेंबरला मुंबईत धडक देण्याची घोषणा जरांगे यांनी केली असून, राज्यभरातील मराठा समाज आता आक्रमक होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, एका मराठा तरुणाने थेट खासदार ओमराजे निंबाळकर यांना फोन करून जाब विचारल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हायरल क्लिपमध्ये संबंधित तरुण ओमराजे निंबाळकर यांना, ‘मनोजदादांचे उपोषण सुरू असताना तुम्ही त्यांना भेटायला का गेला नाही आणि आंदोलनाला सपोर्ट का करत नाही?’ असा थेट सवाल करत आहे. यावर ओमराजेंनी ‘मी अकरा वेळा मनोज जरांगेंकडे जाऊन आलोय, ते तुम्हाला दिसले नाही का?’ असा प्रतिप्रश्न केला. मात्र, या टप्प्यातील आंदोलनावेळी तुम्ही का उपस्थित राहिला नाहीत, असा मुद्दा तरुणाने लावून धरला. ‘आमदार कैलास पाटील जाऊन आले आहेत, आम्ही पण त्यांना भेटायला जाणार आहोत,’ असे उत्तर ओमराजेंनी दिल्याचे या क्लिपमध्ये ऐकायला मिळते.

Omraje Nimbalkar audio clip viral

जरांगेंच्या आंदोलनाला शाहू छत्रपतींचा पाठिंबा

या संवादादरम्यान त्या तरुणाने दोन्ही नेत्यांच्या राजकीय पक्षांवरूनही प्रश्न उपस्थित केला. ‘कैलास पाटील उद्धव ठाकरे गटाचे आहेत आणि तुम्ही शिंदे गटाचे आहात, मग तुमचा आणि त्यांचा संबंध काय? हे चुकीचे आहे, आम्ही मराठा समाज म्हणून तुम्हाला मतदान करतो,’ असे हा तरुण ओमराजेंना विचारत आहे. या ऑडिओ क्लिपची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसली तरी, सोशल मीडियावर त्याची मोठी चर्चा सुरू आहे.

दुसरीकडे, कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी प्रसिद्धीपत्रक काढून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. जरांगे पाटील यांना वेळोवेळी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे आणि सरकारच्या या भूमिकेमुळेच त्यांच्यावर पुन्हा आंदोलनाची वेळ आली, असे शाहू छत्रपतींनी म्हटले आहे. तसेच, कोल्हापूरचा सकल मराठा समाज जरांगे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही