अधिकार क्षेत्राबाहेर धाड टाकणे भोवले; एफडीएच्या आणखी ६ अधिकाऱ्यांच्या निलंबनाला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

पुणे आणि भिवंडीत अनधिकृत रेड टाकल्याप्रकरणी एफडीएच्या २६ अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून मुख्यमंत्र्यांनी ६ जणांच्या निलंबनाच्या फाईलवर शिक्कामोर्तब केले आहे.

Published On: 

Tukaram Mundhe on Nana Patekar

मुंबई, 31 ऑक्टोबर: पुणे आणि भिवंडी येथे अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन धाडी टाकल्याप्रकरणी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागातील २६ अधिकारी अडचणीत आले आहेत. यातील ६ अधिकाऱ्यांच्या निलंबनाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला असून, २० अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून कारवाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी ६ अधिकाऱ्यांवर यापूर्वीच निलंबनाची कारवाई झाली असून, आता आणखी ६ अधिकारी निलंबित होऊ शकतात, असेही सूत्रांच्या हवाल्याने समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पुणे आणि भिवंडीमधील एका तंबाखू (टोबॅको) कंपनीवर कारवाई केली होती. विशेष म्हणजे, ही कंपनी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना होती. असे असतानाही त्यांनी अनधिकृतपणे ही रेड केली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण न्यायालयापासून ते थेट दिल्लीपर्यंत पोहोचले आणि आता या बेकायदेशीर कारवाईमुळे अधिकाऱ्यांवरच कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

या कारवाईसंदर्भातील फाईल एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केल्याने बातमीवरही शिक्कामोर्तब झाले आहे. आज दुपारपर्यंत या ६ अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश समोर येण्याची शक्यता आहे. तसेच २० अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेशही मंत्री कार्यालयातून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कारवाईच्या कचाट्यात सापडलेले हे सर्व वरिष्ठ अधिकारी पुणे आणि मुंबईतील आहेत. यामध्ये मंत्री कार्यालयातील काही अधिकाऱ्यांचाही समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही; त्यामुळे त्यांचीही नावे समोर येतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकीकडे एफडीए हॉटेल्स आणि इतर वस्तूंवर कारवाई करत असताना, दुसरीकडे अधिकाऱ्यांनीच केलेल्या अनधिकृत रेडमुळे त्यांच्यावर ही मोठी कारवाई होत आहे.

यापूर्वी काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या सुपारी प्रकरणामध्ये एफडीएच्या जवळपास ५ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर आता एकाच वेळी तब्बल २६ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईचा ठपका ठेवण्यात आल्याने, हे एफडीएमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रकरण मानले जात आहे. या धडक कारवाईवरून आयुक्त मुंडे आणि मंत्री झिरवळ हे विभागांतर्गत गैरप्रकारांवर कारवाईसाठी पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’वर आल्याचे दिसून येत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही