प्रतिनिधी, 29 ऑक्टोबर: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वांद्रे येथील कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली. सणासुदीच्या काळात नागरिकांना शुद्ध आणि चांगले अन्न मिळावे, यासाठी कारवाईचा वेग वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासूनच राज्यात विविध ठिकाणी छापे टाकून कारवाईचा धडका सुरू आहे. सण जवळ आल्याने एफडीएने नुकतीच १०५७ मसाला उत्पादक आस्थापनांची चौकशी केली. या कारवाईत तब्बल १९.६९ कोटी रुपये किमतीचे ११,९६३ क्विंटल मसाले आणि मसालेजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून ५५७ जणांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत प्रामुख्याने गोदामे आणि कारखान्यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र यापुढे किरकोळ दुकानदार आणि इतर व्यावसायिकांचीही कसून तपासणी केली जाईल, असे मुंढे यांनी सांगितले. दिवाळीत फराळ, मिठाई, चकली, चिवडा आणि इतर खाद्यपदार्थांची विशेष चौकशी केली जाणार आहे. तसेच, खाद्यतेलाबाबतही लवकरच माहिती दिली जाईल. ही मोहीम दिवाळी संपेपर्यंत सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आजारांचे प्रमाण वाढते. यामागे मुदत संपलेले आणि निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ हे मुख्य कारण असते, याकडे तुकाराम मुंढे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे नागरिकांपर्यंत सुरक्षित अन्न पोहोचावे यासाठी प्रशासनाने विशेष आदेश काढले आहेत. आयुक्तांच्या या कडक इशाऱ्यानंतर भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: एकनाथ शिंदेंनी पोलीस आयुक्तांना फोन करून काय दिले होते निर्देश?
- ‘फेकनाथमध्ये हिंमत असती तर…’ प्रदीप पूर्णेकर प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा संताप
- प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: ठाकरे गटाच्या आरोपानंतर मीनाक्षी शिंदे यांचा तडकाफडकी राजीनामा
Quick Answers
एफडीएने केलेल्या कारवाईत १९.६९ कोटी रुपये किमतीचे ११,९६३ क्विंटल मसाले आणि मसालेजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत आणि ५५७ जणांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
दिवाळीच्या काळात फराळ, मिठाई, चकली, चिवडा आणि इतर खाद्यपदार्थांची विशेष चौकशी केली जाणार आहे.
मुदत संपलेले आणि निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ हे सणासुदीत नागरिकांचे आजार वाढण्यामागे मुख्य कारण असते, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







