नाना पाटेकरांचे शेवटचे शब्द मनाला बोचतात; शोकसभेत आठवणी सांगताना तुकाराम मुंढे भावूक

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मुंबईत आयोजित शोकसभेत बोलताना आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी नानांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

Published On: 

Tukaram Mundhe emotional at Nana Patekar funeral in Pune

मुंबई, 15 ऑक्टोबर: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर रोजी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने धक्का बसलेल्या मित्रपरिवार आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत त्यांची शोकसभा पार पडली. या शोकसभेत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाना पाटेकर यांच्यासोबतच्या अनेक वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला. मनोगत व्यक्त करताना मुंढे सर्वांदेखत अत्यंत भावूक झाले होते.

काही दिवसांपूर्वी नानांसोबत झालेल्या शेवटच्या संवादाची आठवण सांगताना मुंढे म्हणाले की, “नानांचा फोन खूप क्वचितच यायचा. एरवी आपण फोन केल्यावर ते नंतर फोन करायचे. मात्र, त्यावेळी फोनवर बोलताना ते शेवटी ‘लव्ह यू बाळा’ असे म्हणाले होते.” हेच शेवटचे वाक्य आज मनाला खूप बोचत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आज आपल्यात त्यांना श्रद्धांजली वाहण्याची ताकद नाही आणि आपण आता त्यांना ‘वी ऑल लव्ह यू’ कसे म्हणणार, अशी हतबलताही त्यांनी बोलून दाखवली.

पडद्यावरचा अभिनेता जेव्हा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जायचा, तेव्हा त्याच्यातला माणूस जागा व्हायचा, असे मुंढे यांनी नमूद केले. २०१५-१६ च्या दुष्काळात मुंढे सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाना व मकरंद सोलापूरला आले होते. त्यावेळी मुंढे यांच्या विनंतीवरून त्यांनी कार्यालयात भेट दिली, त्यानंतर त्यांच्यात संवाद आणि भेटीगाठी वाढत गेल्या.

“आपल्या माणसांना आपण मदत करू शकत नसू, तर आपण कसले माणूस? आपण करू शकणार नसू तर कोण करणार?” असे नाना नेहमी म्हणायचे. सुरुवातीला नाम फाऊंडेशनचा उद्देश आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा होता. मात्र, सरकारी मदतीच्या निकषांत न बसणाऱ्यांची यादी नामकडे पाठवल्यास त्यांना प्राधान्याने मदत देण्याचे नानांनी मान्य केले. त्यानंतर केवळ वैयक्तिक मदतीवर न थांबता सार्वजनिक पातळीवर गावातील दुष्काळ कसा दूर करता येईल, या दिशेने त्यांनी काम सुरू केले.

अभिनयाची आवड असली तरी नानांचे मन गावाकडच्या शेतकऱ्यांमध्ये, कुटुंबात आणि मित्रांमध्ये रमायचे. नाना हा देव किंवा दानव नव्हता, तर तो माणूस होता. आज ते शरीराने आपल्यात नसले तरी, माणूस म्हणून जगण्याचा आणि इतरांचाही माणूस म्हणून जगण्याचा हक्क मान्य करण्याचा त्यांचा विचार कृतीत आणून त्यांचा हा वसा सर्वांनी पुढे न्यायला हवा, अशी भावना तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर रोजी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही