तुकाराम मुंढे यांची ‘झिरो कॉम्प्रोमाईज’ कारवाई; अस्वच्छतेमुळे हॉटेलचा परवाना निलंबित, कॅन्टीनचा व्हिडिओ शेअर

एफडीए प्रमुख तुकाराम मुंढे यांनी दिवाळीत हॉटेल कॅन्टीनचा व्हिडिओ शेअर करत अस्वच्छतेप्रकरणी एका व्यावसायिकाचा परवाना निलंबित केल्याची माहिती दिली.

Published On: 

Tukaram Mundhe warns adulterators | FDA Action

मुंबई, 12 नोव्हेंबर: अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) प्रमुख तुकाराम मुंढे यांची धडक कारवाई सणासुदीच्या काळातही सुरूच आहे. ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत कारवाईचा वेग वाढवला असून, स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. नुकत्याच झालेल्या एका तपासणीत गंभीर अस्वच्छता, उंदरांचा प्रादुर्भाव आणि अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक आढळल्याने एका अन्न व्यावसायिकाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी मुंढे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एका हॉटेलच्या कॅन्टीनचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी ‘झिरो कॉम्प्रोमाईज, तडजोड नाही’ असे कॅप्शन दिले आहे. अन्नसुरक्षा हा पर्याय नसून नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे ते म्हणाले. तसेच, व्यावसायिक हितापेक्षा ग्राहकांचे आरोग्य अधिक महत्त्वाचे असून असुरक्षित आणि निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

भेसळ रोखण्यासाठी एफडीएने जोरदार मोहीम उघडली आहे. यापूर्वी मुंढे यांनी ॲनलॉग पनीर आणि चायनीज पदार्थांमधील कृत्रिम रंगांवर कारवाईचा बडगा उगारला होता, ज्यामुळे अनेक ठिकाणच्या चायनीज हॉटेल्समधील अन्नातून लाल रंग गायब झाल्याचे चित्र आहे. याशिवाय, दिवाळीच्या आधी काजू कतलीवर लावण्यात आलेला चांदीचा वर्ख खरा आहे की ॲल्युमिनियम फॉईल, हे ओळखण्याचे प्रात्यक्षिक दाखवणारा व्हिडिओही त्यांनी शेअर केला होता.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही