८व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांची लॉटरी लागणार? किमान वेतन ६९ हजारांवर नेण्याची NC-JCM ची मागणी

८व्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन ६९,००० रुपये करावे, यासह पेन्शन आणि भत्त्यांमध्ये भरघोस वाढीची मागणी NC-JCM ने केली आहे.

Published On: 

8th Pay Commission recommendations and demands for Central Govt Employees

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगातून मोठ्या आर्थिक फायद्याची शक्यता निर्माण झाली आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (NC-JCM) या कर्मचारी संघटनेने सरकारकडे अशा काही मागण्या मांडल्या आहेत, ज्या मान्य झाल्यास पगार आणि भत्त्यांमध्ये मोठी वाढ होऊ शकते.

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, संघटनेने लेव्हल-१ मधील किमान मूळ वेतन सध्याच्या १८,००० रुपयांवरून थेट ६९,००० रुपये करण्याची प्रमुख मागणी केली आहे. यासाठी ३.८३३ फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची सूचना करण्यात आली असून, काही वेतन स्तर एकमेकांत विलीन करण्याचीही शिफारस आहे.

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर वार्षिक वेतनवाढ सध्याच्या ३ टक्क्यांवरून दुप्पट, म्हणजेच ६ टक्के करण्याची मागणी आहे. तसेच, घरभाडे भत्त्यातही (HRA) वाढ सुचवण्यात आली असून ‘एक्स’ (X) श्रेणीतील शहरांसाठी ३० वरून ४० टक्के, ‘वाय’ (Y) शहरांसाठी २० वरून ३५ टक्के आणि ‘झेड’ (Z) श्रेणीतील शहरांसाठी १० वरून ३० टक्के HRA देण्याचा प्रस्ताव आहे.

निवृत्तीनंतरचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी कर्मचाऱ्यांची पेन्शन शेवटच्या पगाराच्या ५० टक्क्यांवरून ६७ टक्क्यांपर्यंत, तर कौटुंबिक पेन्शन ३० टक्क्यांवरून ५० टक्के करण्याची मागणी संघटनेने केली आहे. याशिवाय निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या रजेच्या रोखीकरणाची (Leave Encashment) मर्यादा ३०० दिवसांवरून ६०० दिवसांपर्यंत वाढवण्याचीही मागणी आहे. या रकमेची गणना मूळ वेतन आणि महागाई भत्ता (DA) मिळून केली जाते.

या प्रमुख आर्थिक मागण्यांसोबतच जुनी पेन्शन योजना (OPS) पूर्ववत लागू करणे, मुलांच्या शिक्षणासाठी अधिक भत्ता, चांगल्या आरोग्य सुविधा आणि पदोन्नतीच्या उत्तम संधी देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

सरकारने ३ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आठव्या वेतन आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाला अंतिम अहवाल देण्यासाठी १८ महिन्यांची मुदत असून, दर १० वर्षांनी होणाऱ्या वेतन सुधारणेनुसार १ जानेवारी २०२६ पासून हा नवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही